लातूर : शिवाजी विद्यालय हंडरगुळी येथे हिंदी दिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक श्रीी. टी.आर.कांबळे यांनी अध्यक्ष स्थान भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून माजी मुख्याध्यापक तेलंगे, माजी शिक्षक वागलगावे, तसेच शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त प्राध्यापक दत्ताभाऊ गलाले उपस्थित होते.या प्रसंगाचे अवचित्य साधून माननीय श्री शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त सेवानिवृत्त प्राध्यापक दत्ताभाऊ गलाले सरांचा सत्कार करण्यात आला. सर्व मान्यवरांनी हिंदी दिवसाचे महत्व सांगून हिंदी भाषा देशाला जोडणारी आहे एकात्मतेला पोषक आहे असे महत्त्व विशद केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री मोमीन सरांनी केले तर आभार शाळेचे पर्यवेक्षक श्री सय्यद सर यांनी मांडले.
लक्ष्मीकांत मोरे
एन.टिव्ही.न्युज मराठी
मो.नं.९१३०५५३९९७
९०२२४९३४९१