महाराष्ट्र द्वेष करण्याच्या आजारातुन बरे व्हा ! युवक राष्ट्रवादीचे राज्यपालांना शेकडो पत्र
सचिन बिद्री:उमरगा
सातत्याने महाराष्ट्र राज्य व महाराष्ट्रातील महापुरुषांचा अवमान करणाऱ्या राज्यपाल कोश्यारी यांची हकालपट्टी करत परत त्यांना बोलवा असे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महामहीम राष्ट्रपतींना तहसीलदारांच्यामार्फत (दि .१ सोमवार) रोजी निवेदन देण्यात आले . तर राष्ट्रवादी युवक काँगेसच्या वतीने महाराष्ट्र द्वेष करण्याच्या आजारातुन बरे व्हा ! असे शेकडो पत्र यावेळी कार्यकर्त्यांच्या वतीने पाठवण्यात आले आहे .
राष्ट्रपतींना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे सातत्याने महाराष्ट्र राज्यातील महापुरुषांचा व महाराष्ट्र राज्याचा अवमान होईल असे वक्तव्य करीत आहेत. त्यांच्या या वक्तव्यावरुण त्यांची भुमीका राज्यपाल पदाचा सन्मान व मर्यादा न ठेवता ते राजकारणात सक्रिय भुमीका घेत आहेत. हे निषेधार्यच आहे. अशा महाराष्ट्र द्वेष्ट्या व्यक्तीची महाराष्ट्राचा राज्यपाल म्हणुन कामकाज पहाणे महाराष्ट्रासाठी घातक आहे. तरी अश्या व्यक्तीची हकालपट्टी करुण त्यांना परत बोलवुन महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेणाऱ्या नविन राज्यपालाची नियुक्ती करावी असे निवेदनात म्हटले आहे .
उमरगा तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने राज्यपालांना शेकडो पत्र पाठवण्यात आली यात आपण महाराष्ट्र राज्याच्या कल्याणासाठी राज्यपाल आहात की महाराष्ट्र द्वेष करण्यासाठी असा प्रश्न विचारत राज्यपाल या घटनात्मक पदाची शपथ घेतली तिचे प्रामाणिकपणे पालन कराल आणि महाराष्ट्र द्वेष करण्याच्या आजारातून बरे व्हाल हीच माफक अपेक्षा, लवकर बरे व्हा ! असा पाठवण्यात आलेल्या पत्रात मजकूर लिहिण्यात आला आहे.
या आंदोलनाप्रसंगी राष्ट्रवादि काँग्रेसचे दिग्विजय शिंदे,तालुका अध्यक्ष संजय पवार,शमशोद्दीन जमादार,बाळासाहेब स्वामी,धिरज बेळंबकर,फैय्याज पठाण,अफसर मुल्ला,नेताजी कवठे,ज्ञानदिप सुर्यवंशी,बाळु परताळे,राहुल बनसोडे, दिपक हिप्परगे,अप्पु हिप्परगे, बसवेश्वर माळी,काशिनाथ गायकवाड , बालाजी मस्के,नितीन बिराजदार, सोहम स्वामी यांच्यासह प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थीत होते.