विद्युत महामंडळ औरंगाबाद प्रादेशिक विभागाने केली अनोख्या उपक्रमाला सुरुवात.
उस्मानाबाद : (उमरगा) वीजबिल भरण्यासाठी रांगेत थांबण्याची कटकट बाजूला ठेवून ऑनलाइन वीजबिल भरणाऱ्या लघुदाब वीजग्राहकांचे प्रमाणात जिल्ह्यात वाढ होत आहे.हे डिजिटल पेयमेंट मुळे हे शक्य झाले असून अगदी वेळेत वीजबिल भरणा घरबसल्या शक्य होत आहे. ज्यांना हे शक्य नाही त्यांनी बील भरणा केंद्रावर जाऊन वेळेत बिल भरणा केल्यास आकारण्यात येणारा संभाव्य आर्थिक दंड स्वरूपातची रक्कम बचत होतेच शिवाय अश्या ग्राहकांना आता विद्युत महावितरणातर्फे भेट स्वरूपात सरप्राईज गिफ्ट दिले जाणार आहे.
महाराष्ट्र राज्यातून या उपक्रमाची सुरुवात मराठवाड्यातुन झाली असून औरंगाबाद प्रादेशिक विभागाने प्रत्येक जिल्ह्यातील तालुका पातळीवर अश्या ग्राहकांची यादी तयार केली होती सदर यादीतून सोडत काढीत दि ११ जुलै २०२२ रोजी उस्मानाबाद मंडळ-उमरगा उपविभाग-लोहारा उपविभाग-तुळजापूर विभागातून आठ ग्राहकांच्या नावांची यादी या बक्षीस यादीत घोषित केले होते. यामध्ये उमरगा उपविभागांतर्गत ग्राहक क्रमांक- 596520183647 श्री सुरेश शरणाप्पा पुजारी,आणि ग्राहक क्रमांक 597570376965 श्री सुधाकर कुलकर्णी यांना प्रत्येकी एक हजार रुपये पर्यंतच्या मूल्याचे भेट वस्तू उमरगा एम एस इ बी च्या अधिकाऱ्यांतर्फे संबंधित ग्राहकांच्या घरी जाऊन मोठ्या सन्मानाने देण्यात आले.
वीजबिल भरणा केंद्राच्या रांगेत उभे राहणे टाळून घरबसल्या कोणत्याही वेळेत ऑनलाइन वीजबिल भरण्याची सोय वीजग्राहकांना उपलब्ध असून या सोयीमुळे ग्राहकांना नक्कीच वेळेचा आणि पैश्याचा बचत होणार आहे. कागदी स्वरूपात येणारे बिल नाकारून ऑनलाइन बिल ची मागणी केल्यास त्यातही काही प्रमाणात वार्षिक बचत होते.
उमरगा उपविभागातील लाभार्थी ग्राहकांना सदर बक्षीस वितरण करताना उपकार्यकारी अभियंता आर एम शेंडेकर,सहायक अभियंता जे डी जाधव,प्रधान तंत्रज्ञ भीमराव एम चव्हाण, लेखापाल श्री राजेंद्र जामगे व इतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
सचिन बिद्री