उस्मानाबाद : उमरगा आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त व स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या उपक्रमांतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनी "आजादी का अमृत महोत्सव" कार्यक्रमांतर्गत तब्बल ७५ फूट तिरंग्यासह श्री छ. शिवाजी महाराज महाविद्यालयातील 750 विद्यार्थी, प्राध्यापक,शिक्षकेतर कर्मचारी यांनी जनजागृती रॅली मध्ये सहभाग घेत भव्य आकर्षक शोभा यात्रेचे (दि १२)रोजी आयोजन करण्यात आले होते श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त उपजिल्हा रुग्णालय उमरगा, विधी सेवा समिती उमरगा, आणि पोलीस स्टेशन उमरगा यांच्या संयुक्त विद्यमाने युवकांना संस्कारक्षम बनवण्यासाठी लोकशाही मूल्यांचे संरक्षण करून व्यसनाधीनते पासून दूर राहून सक्षम आणि समृद्ध संस्कारक्षम पिढी बनण्यासाठी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षे घरोघरी तिरंगा लावून वचनबद्ध राहू असा संदेश देत रॅलीचे आयोजन करण्यात आले.

श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयापासून रॅलीचा शुभारंभ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.घनश्याम जाधव,उपप्राचार्य डॉ व्ही एस इंगळे उपप्राचार्य डॉ डी व्ही थोरे उपप्राचार्य प्रा जी एस मोरे पर्यवेक्षक प्रा शैलेश महामुनी, प्रबोधक राजकुमार सोनवणे कार्यालयीन अधीक्षक नितीन कोराळे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.या रॅलीमध्ये श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय एनसीसी, एनएसएस आणि सर्व विभागात विभागाने सहभाग घेतला होता. महाराष्ट्र शासनाच्या करियर कट्टा अंतर्गत महाविद्यालयाच्या स्वतंत्र कक्षाने सहभाग घेतला.शहरातील रोटरी क्लब व्यापारी महासंघ आणि विविध संघटनांनी रॅलीत सहभाग नोंदविला. या रॅलीचा समारोप पोलीस उपविभागीय अधिकारी रमेश बरकते, उमरगा पोलीस स्थानकाचे पो. निरीक्षक एम ए राठोड,राठोड मॅडम आणि सर्व सहकारी आदींच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त विद्यार्थ्यांना पोलीस अधिकारी रमेश बरकते यांनी शपथ वाचन केले. या रॅलीसाठी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.विक्रम आळंगेकर,डॉ. वाघमारे,डॉ. कुलकर्णी तसेच अभय भालेराव,अनिल चव्हाण पूजा बायस, ए व्ही केंद्रे , तालुका विधी सेवा समितीचे एम आय शेख, पी व्ही शेटे, एस के मुळे, ए पी गुरव आदींनी पुढाकार घेतला या रॅलीसाठी एनसीसी चे कमांडर डॉ.डी एस चीतमपल्ले राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. जी एन सोमवंशी डॉ विनोद देवकर डॉ पी एल सावंत करिअर कटाचे डॉ ए के कटके, प्रा भरत शेळके यांनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ संजय अस्वले यांनी केले.यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *