रोहित्र(ट्रान्सफर्मार)बदलून विद्युत पुरवठा सुरळीत..

उस्मानाबाद : उमरगा-लोहारा तालुक्यातील तब्बल आठ ते दहा गाव-तांडा-वस्ती गेल्या १५ दिवसांपासून अंधारात असून विद्युत महावितरण मंडळाच्या अधिकाऱ्यांतर्फे उडवाउडवीची उत्तरे भेटत असल्याने संबंधित ग्रामस्थांतुन संताप व्यक्त होत असल्याबाबत सविस्तर वृत्त Ntv न्युज मराठीने प्रकाशित करताच संबंधित विभाग खडाडून जागे झाले व संबंधित अंधारात असलेल्या गावांमधील बंद अवस्थेतील रोहित्र बदलून खंडित विद्युत पुरवठा सुरळीत करण्यास सुरुवात झाली आहे.
महाराष्ट्राची आघाडीची वृत्तवाहिनी Ntv न्युज मराठीने सदर बाबीची दखल घेत, जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याशी सविस्तर चर्चा करून बातमी प्रसारित केली होती,दरम्यान खासदार ओमराजे निंबाळकर यांनी एम एस ई बी च्या वरिष्ठांकडून सविस्तर माहिती घेत आढावा घेऊन त्वरित आदेश पारित करण्यात येनार असल्याचे सांगितले होते.

Ntv न्युज मराठी Impact
बातमी प्रकाशित होताच खडाडून जागे झालेल्या MSEB तर्फे मुळज तांडा,
जकेकुर,हिप्परगा गावठाण,मळगी -गावठाण आदी गावात रोहीत्र बदलून देण्यात आले आहेत व उर्वरित गावात बंद अवस्थेतील रोहित्र दुरुस्ती चे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

उमरगा तालुक्यातील ही गावे होती अंधारात…

१) मुळज तांडा – 63 kva,३) तुरोरी तांडा – 100 kva,4) मळगी – 100 kva( FF ) ,5) बलसुर ताडा – 100 kva( दोन महिन्यांत ७-८ वेळा जळाला आहे),6) बेळब – २x २५ kva (FF),7) जकेकुर चित्ते DTC – 63 kva ( 15 दिवसांत तीन वेळा फेल झाला आहे ),8) हिप्परगा गाव – 100 kva असे एकूण आठ(८) अंधारमय गावांची यादी व तपशील Ntv न्युज मराठी च्या तपासातुन समोर आले,याबाबत सविस्तर वृत्त दि 10 ऑगस्ट रोजी Ntv तर्फे वृत्त प्रसारित करण्यात आले होते.
याबाबत Ntv न्युज तर्फे तुळजापूर व उस्मानाबाद येथील वरिष्ठांना विचारणा केली असता रोहित्र यंत्रात वापरण्यात येणाऱ्या तेलाची पूर्तता जिल्ह्यालाच वेळेत उपलब्ध होत नसल्याचे समोर आले होते.

“गेल्या पंधरा दिवसांपासून दररोज अधिकाऱ्यांकडून मिळणाऱ्या उडवाउडवीची उत्तरामुळे संताप वाढत होता,एन टी वी ने दखल घेत वृत्त प्रकाशित करताच संबंधित विभागातर्फे जकेकुर गावातील बंद अवस्थेतील रोहित्र बदलून खंडित विद्युत पुरवठा सुरळीत केला आहे- अनिल बिराजदार-सरपंच जकेकुर

सचिन बिद्री, उमरगा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *