अधिकाऱ्यांची उडवाउडवीची उत्तरे-खासदार ओमराजे घेणार आढावा..!
सचिन बिद्री:उमरगा
उमरगा-लोहारा तालुक्यातील तब्बल आठ ते दहा गाव-तांडा-वस्ती गेल्या १५ दिवसांपासून अंधारात असून विद्युत महावितरण मंडळाच्या अधिकाऱ्यांतर्फे उडवाउडवीची उत्तरे भेटत असल्याने संबंधित ग्रामस्थांतुन संताप व्यक्त होत आहे.
गेल्या १५ दिवसांपासून गावातील रोहित्र(ट्रान्सफर्मार) जाळल्याने काही भाग अंधारात असून वाढत्या डासांच्या प्रादुर्भावाने व एम एस ई बी च्या गलथान कारभारामुळे त्रस्त नागरिक वेळोवेळी उमरगा शहरातल्या संबंधित कार्यालयातील अधिकाऱ्यांना जाभ विचारण्यासाठी गर्दी करताना दिसून येत आहेत पण उमरगा, तुळजापूर आणि जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांतर्फे केवळ उडवाउडवीची उत्तरे भेटत असल्याचा आरोप नागरिकांतर्फे करण्यात येत आहे.अनेक गावातील रोहित्र(ट्रान्सफारर्मर) जाळल्याने गाव अंधारमय झाले आहेत तर सदर रोहित्र बदलून किंवा दुरुस्ती करून वीज पुरवठा सुरळीत करण्यात एम एस इ बी विभाग अपयशी ठरत आहे. याबाबत अधिकाऱ्यांतर्फे सांगण्यात येत आहे की, रोहित्र मध्ये वापरण्यात येणारा (ऑइल) तेल उपलब्ध नाही, जो पुरवठा जिल्ह्यतुन होत असतो तो गेल्या काही दिवसांपासून पुरवला जात नाही त्यामुळे आम्ही काहीच करू शकत नाही”.पण अश्या या अनपेक्षित उत्तरामुळे ग्रामस्थांतुन (ग्राहकातून)संताप व्यक्त केला जात आहे.विद्युत महामंडळाच्या या गलथान कारभारामुळे उमरगा तालुक्यातील अनेक गावातील रोहित्र दुरुस्ती कित्येक दिवसांपासून प्रलंबित आहेत. ज्याचा फटका (त्रास)सर्वसामान्य जनतेला सहन करावा लागत आहे. उमरगा तालुक्यातील १) मुळज तांडा – 63 kva,३) तुरोरी तांडा – 100 kva,4) मळगी – 100 kva( FF ) ,5) बलसुर ताडा – 100 kva( दोन महिन्यांत ७-८ वेळा जळाला आहे),6) बेळब – २x २५ kva (FF),7) जकेकुर चित्ते DTC – 63 kva ( 15 दिवसांत तीन वेळा फेल झाला आहे ),8) हिप्परगा गाव – 100 kva असे एकूण आठ(८) अंधारमय गावांची यादी व तपशील Ntv न्युज मराठी च्या तपासातुन समोर आले आहे. याबाबत Ntv न्युज तर्फे तुळजापूर व उस्मानाबाद येथील वरिष्ठांना विचारणा केली असता रोहित्र यंत्रात वापरण्यात येणाऱ्या तेलाची पूर्तता जिल्ह्यालाच वेळेत उपलब्ध होत नसल्याचे समोर आले.
–//–//
“गेल्या दोन महिन्यांपासून सदर तेलाचा उस्मानाबाद जिल्ह्याला सुरळीत पुरवठा होत नाही,आलं तरी अत्यल्प येत असल्याने अडचणी उद्भवत आहेत,आठवड्याच्या प्रत्येक मंगळवारी वरिष्ठांना आमच्यातर्फे मागणी होत असते,पण शॉर्टफॉल असल्याने मी पण काही करू शकत नाही.मागील आठवड्यात 5 के एल तेल जिल्ह्याला आला होता,त्यापैकी 3 जिल्ह्यासाठी व केवळ 2 के एल तीन तालुक्यासाठी दिले जाते,2 के एल मध्ये एकूण १० बॅरेल तेल असतो.या १० बॅरेल चा उपयोग उमरगा लोहारा आणि तुळजापूर असे तीन तालुक्यातील रोहित्र दुरुस्ती करिता वापरण्यात येतो जो की मागणीपेक्षा कमी प्रमाण आहे.तरी लवकरात लवकर समस्या सोडवून नागरिकांना उत्तम सेवा देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. उमरगा तालुक्यातील अडचणी दोन दिवसात मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील आहोत”.— राजेंद्र गुजर-MSEB कार्यकारी अभियंता,तुळजापूर
–//–
“जिल्ह्याला पुरवठा होणारा तेल(Oil) आणि रोहित्र(ट्रान्सफार्मर) कमतरता बाबत संबंधित अधिकाऱ्याकडून माहिती घेऊन पुरवठा सुरळीत होण्यासाठी आदेश देण्यात येईल व लवकरच अश्या अडचणी पुन्हा उद्भवणार नाहीत,सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांच्या विद्युत पुरवठा खंडित बाबत प्रश्न मार्गी लावू”— ओमराजे दादा निंबाळकर,खासदार
–//–//–
“गेल्या पंधरा दिवसांपासून दररोज अधिकाऱ्यांना विचारणा करून कंटाळा आला आहे,अखेर वैतागून आज औद्योगिक वसाहतीतील उद्योजकाकडून नवे किंवा जुने ‘रोहित्र’ खरेदी करून बसवण्याचा मानस होता पण खाजगीतही उपलब्ध होत नाही.पंधरा दिवसांपासून गावातील काही भाग अंधारात आहे. वारंवार पाठपुरावा करूनही वरिष्ठांकरून केवळ उडवाउडवीची उत्तरे भेटत असल्याने ग्रामस्थांची सोय होण्यासाठी प्रयत्न करतोय पण विद्युत महामंडळाचा खूप वैताग आला आहे”.- अनिल बिराजदार-सरपंच जकेकुर