हिंगोली : सेनगाव तालुक्यातील केंन्द्रा बुद्रुक गावच्या तंटामुक्ती अध्यक्ष पदासाठी दि.22 आॅगष्ट रोजी पार पडलेल्या ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा करून गावच्या तंटामुक्ती अध्यक्ष पदासाठी निवडप्रक्रिया पार पडली यामध्ये ऐनवेळी दोघांनी माघार घेतली त्यामध्ये नाजेरशहा यांना सर्वाधिक मते मिळाली असुन त्यांची केंद्रा बुद्रुक गांवच्या तंटामुक्ती अध्यक्ष पदी निवड झाली आहे.

नाजेरशहा यांनी प्रहार पक्षाच्या माध्यमातून भ्रष्टाचार करणाऱ्या ग्रामपंचायत तसेच विविध आंदोलने केली. तसेच केंद्रा ग्रामपंचायत कार्यालयाच्या भ्रष्ट कामकाजासाठी त्यांनी टावरवर चढून आंदोलन केले होते हा विषय संपुर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला होता नाजेरशहा यांची सर्वसामान्य नागरिकांसाठी तळमळीने काम करण्याचा पुढाकार पाहता यांची पोच पावती म्हणून त्यांना गावातील नागरीकांनी थेट तंटामुक्ती अध्यक्ष पदासाठी निवडणूक दिले नाजेरशहा यांची प्रथमच तंटामुक्ती अध्यक्ष पदासाठी निवड झाल्यानें विविध स्तरांवर स्वागत केले जात आहे. म्हणून पुंडलीकराव बल्लाळ यांनी तंटामुक्ती अभियान सुरू झाले तेव्हा पासुन आज पर्यंत केंन्द्रा बुद्रुक गावात तंटामुक्ती अध्यक्ष म्हणून होते