गोंदिया : जिल्ह्यात यंदा पावसान कहरच केला. अनेक गावात पुर आलेत, नदी-नाले ओसंडुन वाहु लागलेत. या अतिव्रुष्टीचा अनेक ग्रामीन भागासह शहरी भागातील सामान्य नागरीकांना चागलांच फटका बसला अनेकांची घरे पडली, संबधित विभागाने पंचनामाही केला पंरतु या अतिव्रुष्टीत बेघर झालेल्या नागरीकांना वेळेवर मदत मिळने कठीनच असल्याने गोंदिया जिल्हाचे अपर पोलिस अधिक्षक असोक बनकर यांच्या संकल्पनेने “एक काम वतन के नाम” या सामाजीक उपक्रमाअंतर्गत अतिव्रुष्टीचा फटका बसलेल्या नागरीकांना मदत करन्याचे आव्हान करन्यात आले आहे.
जिल्ह्याच्या देवरी शहरात अतिव्रुष्टीमुळे एकुण ४० कुटुंबाना चांगलाच फटका बसला. त्यांचे अखे कुटुंब रसत्यावर आले. त्यानां मदतीचा हात म्हणुन आप-आपल्या परीने आर्थिक मदत करुन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा निर्धार करन्याचे आवहान अपर पो. अधिक्षक असोक बनकर यांनी केले आहे. या करीता काही अडचन भासल्यास किवां माहीतीस्तव अपर पोलीस अधिक्ष कार्यालय देवरी याठीनी संपर्क साधन्याचेही आव्हान पोलिस विभागातर्फे करन्यात आले आहेत.
विशेषता गोंदिया जिल्ह्याच्या देवरी शहरात अतिवृष्टीमुळे अनेक भागातील नागरीकांच्या घरात पाणी शिरून शेकडो लोकांचे प्रचंड नुकसान झाले. झालेल्या अतिव्रुष्टीने हातावर पोट असणाऱ्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. घरातील अन्नधान्याची यात नासाडी झाली. यातील अनेक कुटुंबे कमकुवत आर्थिक गटातील असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ ओढवली. घरातील साहित्या-बरोबरच मुलांच्या शैक्षणिक साहित्याचेही नुकसान झाले आहे. देवरी शहरातील अतिव्रुष्टीचा फटका बसलेल्या त्या ४० ही कुटुंबाना तातडीने आर्थिक मदत व्हावी याच उद्देशाने अपर पोलिस अधिक्षक असोक बनकर यानीं “एक काम वतन के नाम” या उपक्रमाची सुरूवात केली आहे. या अपक्रमा अंतर्गत आप-आपल्या परिने त्या कुटुंबाना आर्थीक मदत करुन त्यानां समाजाच्या प्रवाहात आना असे आव्हान असोक बनकर यानीं केले आहे.