उमरगा पोलिसांनी ‘जयपाल’ च्या प्रामाणिकपनाचा केला सत्कार
(सचिन बिद्री:उमरगा)
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथील एका शेतकरी युवकाने चुकीने नऊ हजार पाचशे रुपये उमरगा शहरातील बाजारासमितीतील कर्मचारी जयपाल राजेंद्र कांबळे यांच्या खात्यावर पाठविले तेंव्हा जयपाल ने आपला प्रामाणिकपणा दर्शवत सदर रक्कम संबंधित शेतकऱ्यास परत पाठवून एक आदर्श निर्माण केला,जयपालच्या प्रमाणिकपणाबद्दल उमरगा पोलिसांनी सत्कार करीत सन्मानित केले. घाईगडबडीत फोन पे द्वारे पैसे पाठवितांना मोबाईल क्रमांकात नजर चुकीने किरकोळ चूक झाल्याने एकाचे पैसे दुसऱ्यालाच गेल्याचा प्रकार येथे घडला. मात्र काही देणेघेणे नसतांना बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथून आलेले पैसे परत करून आजही प्रामाणिकपणा जिवंत असल्याचे उमरगा येथील जयपाल कांबळे या कृषि उत्पन्न बाजार समितीतील कर्मचाऱ्यांने दाखवून दिले आहे.
दि 3 सप्टेंबर रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती कर्मचारी जयपाल राजेंद्र कांबळे वय 30 वर्षे यांच्या मोबाईलवर (संतोष भगवान ठाकरे)या अनोळखी व्यक्तीकडून आपल्या खात्यावर रु 9500 जमा झाले बाबत मॅसेज आला.ज्या मो नंबर वरून पैसे आले त्यास फोन करून आलेल्या राकमेबाबत विचारपूस केली असता 8793803041 हा फोन पे नंबर बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथील संतोष भगवान ठाकरे यांचा असल्याचे स्पष्ट झाले व येथील शेतकरी चेतन जाधव यांनी आपल्या दुचाकीचा फायनान्स हप्ता भरण्यासाठी पैसे भरण्यासाठी ठाकरे यांच्या महाईसेवा केंद्रात गेला होता, पण केवळ एक अंक शेतकऱ्यांनी चुकीचा सांगितल्याने सदर रक्कम उमरगा शहरातील जयपाल कांबळे यांच्या फोनपे वर जमा झाली.
अनोळखी व्यक्तीकडून प्राप्त रक्कम संबंधित व्यक्तीचा शोध घेऊन त्या व्यक्तीला पैसे परत पाठविल्याने जयपाल कांबळे यांच्यातील तत्परता व प्रामाणिकपणा पाहता उमरगा पोलिसांनी पुष्पहार घालून सत्कार केला.यावेळी पो हे कॉ विष्णू मुंडे, पो हे कॉ कांतू राठोड, पो हे कॉ नागनाथ वाघमारे, पो कॉ भागवत घाटे, सामाजिक कार्यकर्ते संदीप चौगुले, अभिजित बिद्री,यशपाल राजेंद्र कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.