तालुक्यात डीजे मुक्त गनपतीला गणेश मंडळाची मंजुरी…
गोंदिया : गोंदिया जिल्ह्याच्या देवरी पोलीस्टेसन कार्यालयात गणेश मंडळाच्या पदाधीकार्यांची बैठक अपर पोलिस अधिक्षक अशोक बनकर यांच्या प्रमुख उपस्तीत देवरी पोलिस्टेसनचे ठानेदार रेवचंद सिंगनजुडे यानीं घेतली. सगळ्या गणेश मंडळानां यंदाच्या वर्षी गणेशोत्सव काळात मंडळांनी सामाजिक उपक्रम हाती घेऊन सामाजिक सलोखा जपण्याचे काम करावे, असे आवाहन अपर पोलिस अधिक्षक अशोक बनकर यांनी केले. देवरी पोलीसस्टेसन येथे आज रोजी शांतता बैठकीचे आयोजन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
गणेश मंडळाच्या पदाधिकार्यानां मार्गदर्शन करतानीं पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे म्हणाले की, शासनाचे सर्व नियम पाळून मंडळांनी गणेश उत्सव साजरा करायचा आहे. गणेश उत्सावाचतुन उरणारा खर्च हा गावात सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे , जेणे करून गावात होनार्या चोरीला आळा बसेल, शहरात अनेकांचे परीवार अतिव्रुष्टीमुळे रसत्यावर आले आहेत त्यानां मदत करा. तसेच प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. गेली दोन वर्षे कोरोनाच्या सावटाखाली गणेशोत्सव अतिशय साधेपणाने साजरे करण्यात आले. यावर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आनंदात साजरे करा असेही पोलीस निरीक्षक मा श्री रेवचंद सिंगनजुडे साहेब म्हणाले. विशेषता शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही हा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. त्यातच सतत राबवीत असलेल्या देवरी पोलिसांच्या सामाजीक बांधिलकीच्या उपक्रमात सामील होऊन डी.जे मुक्त गणपती साजरा करा असा प्रस्ताव ठानेदार सिंगनजुडे यानीं गणेमंडळाच्या बैठकीत मांडले. त्यात सगळ्या गणेश मंडळानी स्वखुशीने डी.जे. मुक्त गणपतीचा प्रस्ताव मान्य केला असुन यावर्षी देवरी शहरात व तालुक्यात डीजे मुक्त गणपती साजरा होनार असल्याचे चित्र पहायला मिळनार आहे.
सर्वच निर्बंध शिथिल केल्याने गणपती बाप्पाचे आगमन धुमधडाक्यात होणार आहे. गणेश मूर्तीची विटंबना होणार नाही याची दक्षता घ्यावी, विसर्जन प्रसंगी मिरवणूक काढावयाची असल्यास तसेच नदीवर- तलवात गणपती विसर्जन करायचे असल्यास अगोदर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. यामुळे होणाऱ्या विपरीत घटनांना आळा बसेल. एक गाव एक गणपती राबवणेही गरजेचे असून कायदा व सुव्यवस्था राखावी, होणाऱ्या गणेश मंडळात कुणी मद्यपान करून आढळल्यास त्याची गय केली जाणार नसल्याचेही बैठकीत सांगण्यात आले. यावेळी देवरी शहरासह तालुक्याच्या गावांमधील गणेशोत्सव मंडळांचे अध्यक्ष व सचिव मोठ्या संख्येने उपस्थित होते.