गोंदिया:- फेडरेशन ऑफ इंडस्ट्रीज असोसिएशन ऑफ विदर्भ (FIA) नागपूर या प्रतिष्ठित संस्थेची नवी कार्यकारिणी २०२५-२०२७ या कालावधीसाठी नुकतीच गठीत करण्यात आली. या संस्थेत विदर्भातील १२ जिल्ह्यांमधून सदस्यांचा समावेश केला जातो.
या नव्या कार्यकारिणीत गोंदिया जिल्ह्यातून केवळ दोन उद्योगपतींची निवड झाली आहे. गोंदिया शहरातून दिनेश जी अग्रवाल यांची तर आमगाव येथून श्रीनाथ राईस मिल चे संचालक सोमेश संतोषकुमार असाटी यांची कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.

FIA नागपूरसारख्या मोठ्या व प्रभावी उद्योगसंस्थेत श्री. सोमेश असाटी यांची झालेली निवड ही आमगाव वासीयांसह संपूर्ण गोंदिया जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे. त्यांच्या या यशाबद्दल त्यांना हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन देण्यात येत आहे.
राधाकिसन चुटे जिल्हा प्रतिनिधी गोंदिया