ठेकेदार होत आहे गब्बर तर भ्रष्ट अधिकारी मालामाल
झालेल्या बोगस कामांच्या पुराव्यानिशी तक्रारी वरिष्ठ यंञणेकडे होणार
वाशिम : वाशिम जिल्ह्यासह मंगरुळपीर तालुक्यात सध्या विकासकामांच्या भुमीपुजनांचा सपाटा सुरु आहे.हजारो रुपये खर्जुन माध्यमांना जाहीराती देवुन खुष करण्याच्या आड माञ दर्जाहीन कामे करुन ठेकेदार गब्बर तर भ्रष्ट अधिकारी मालमाल होत असल्याने शासनाच्या करोडोंच्या निधीला माञ चुना लावण्याचे काम राजरोजपणे सुरु असुन याकडे आमदार महोदयांनी लक्ष देन्याची मागणी जनतेमधुन होत आहे.राज्यशासनाच्या २०२२-२३ बजेट अंतर्गत वाशिम मंगरुळपीर मतदार संघातील ४५ कोटींची अत्यावश्यक व जनतेच्या ऊपयोगी कामे आमदार साहेबांनी मंजुर केलीत.यामध्ये मंगरुळपीर तालुक्यातीलही कामे आहेत.या माध्यमातुन आता विकासकामे होणार आहेत ही गौरवाची बाब आहे परंतु मर्जीतीलच लोकांना कामे देवून भ्रष्ट अधिकार्यांना हाताशी धरून बोगस कामे याआधी मंगरुळपीर तालुक्यात विविध ठिकाणी झालीत,या बोगस कामातुन लाखोंची माया जमवून काही ठेकेदार गब्बर तर काही भ्रष्ट अधिकारी मालामाल झालेत.अशा झालेल्या बोगस कामांची आमदार साहेबांनी आणी वरिष्ठ प्रशासकीय यंञणांनी पाहणी करुन व गुणनियंञक पथकामार्फत कामांची तपासणी केल्यास सदर कामांचा दर्जा लगेच लक्षात येईल.अशी अनेक कामे याआधी बोगस करुन खिसे भरलेत.आतातरी मंजुर झालेल्या कामावर लक्ष ठेवुन दर्जेदार कामे करवुन घ्यावीत अन्यथा जनतेमधून आंदोलन करण्याची संभावना आहे.लवकरच बोगस कामांच्या पुराव्यानिशी तक्रारी वरिष्ठ यंञणेला देण्यात येणार असल्याची माहीती मिळाली आहे.
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरूळपीर/वाशिम
मो.8459273206