सचिन बिद्री:उमरगा
उमरगा तहसील कार्यालयामार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की,एक मराठा म्हणून असो की एक भारतीय म्हणून असो आम्ही नेहमीच पोलिसांचा आणि त्यांच्या वर्दीचा आदर,सन्मान राखलेला आहे तो पुढेही राखला जाईल.पण त्यातीलच एक पोलीस कर्मचारी जर मराठा समाजाबद्दल अश्लील शब्दात जर गरळ ओकत असेल तर आम्हाला आमचा समाज प्रिय आहे.आमच्या समाजाबद्दल काढलेला त्या वाईट शब्दांमुळे चार कोटी मराठ्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्यांना,गृहमंत्र्यांना महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था बिघडून द्यायची नसेल तर तात्काळ या मनोरुग्ण पोलीस कर्मचाऱ्यावर बडतर्फीची कार्यवाही करावी,अन्यथा याचे परिणाम फार वाईट होतील याचीही नोंद घ्यावी. मराठा समाजावर अत्यंत हीन भाष्य करणारा नीच प्रवृत्तीचा पीएसआय किरण बकाले याला तात्पुरते निलंबित न करता नोकरी मधून कायमस्वरूपी काढून टाकावे.जेणेकरून वर्दी मधील कुठलाही व्यक्ती संविधानाच्या चौकटीच्या बाहेर जाऊन वक्तव्य करण्याचे धाडस करणार नाही. एखाद्या पोलीस कर्मचाऱ्यांनी कोणत्याही समाजाबद्दल आकसभाव ठेवणे हे सामाजिक सलोखा राखण्याच्या दृष्टीने अत्यंत घातक असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.तसेच यामुळे अशी प्रवृत्ती पोलीस खात्यातून हद्दपार करावी. याचे कायम स्वरूपी निलंबन करून नोकरीवरून तात्काळ काढून टाकण्यात यावे व हा निर्णय लवकर व्हावा.अन्यथा मराठा समाज याचा निकाल स्वतः करेल व त्यानंतर होणाऱ्या परिणामास जबाबदार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पोलीस प्रशासन असेल याची नोंद घ्यावी.असेही या निवेदनात म्हटले आहे. विनोद कोराळे,दत्ता शिंदे,नितीन सुरवसे,सुमित घोटाळे,अमर वरवंटे, अमोल पाटील,शैलेश लोखंडे,प्रसन्न पुदाले,विठ्ठल पवार,शंकर बिराजदार, प्रदिप भोलसे,योगेश तपसाळे,मनोज जाधव,गोपाळ पवार,धर्मराज जाधव, रोहित सुर्यवंशी आदी उपस्थित होते.