शिवासंघटनेला जो पक्ष सोबत घेऊन काम करेल त्याच्या सोबत शिवासंघटना काम करण्यास तयार..!

सचिन बिद्री:उमरगा

उस्मानाबाद : लोहारा तालुक्यातील अचलेर येथे, शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या शाखेचा २१ व्या वर्धापन दिनानिमित्त भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी संघटनेचे संस्थाप अध्यक्ष प्रा.मनोहर धोंडे हे बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थांनी राजशेखर महास्वामीजी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून बसवराज स्वामी (अचलेर),विरतेश्वर महास्वामीजी (विरक्त मठ केसरजवळगा),बसवराज स्वामी (उदगीर),सुत्रेश्वर स्वामीजी,दत्त महाराज (अचलेर),या कार्यक्रमाचे उदघाटक, संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष शिवा संघटना प्रा. मनोहर धोंडे व माजी आमदार तथा शिवा संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवशरण पाटील, राष्ट्रीय चिटणीस उमाकांत शेटे,राज्य सरचिटणीस सातलींग स्वामी,परमेश्वर अरबळे,माजी जिल्हा परिषद सदस्य बसवराज पाटील उदगीरकर,अरविंद भडोळे पाटील, श्रावण जंगम,संतोष केळंगावकर राजकुमार सारणे, बसवरज वरनाळे,अखिल भारतीय वीरशैव युवक संघटना जिल्हा प्रमुख धाराशिव राजेंद्र कारभारी,सुरेश वाले, संजय गिराम,शिवा संघटना तालुका प्रमुख उमरगा अमर वाले,अशोक पाटील,दत्तात्रय पाटील,कृष्णप्पा पाटील,परमेश्वर पटणे,सिद्रामप्पा दुलंगे, चंदरराव पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.


माजी आमदार तथा आखिल भारतीय वीरशैव युवक संघटना राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवशरण पाटील (बिराजदार) यांनी बोलताना म्हणाले की, “आपण काम करताना कधीच अचलेर हे गाव विसरणार नाही कारण शिवा संघटनेचे काम करताना अनंत अडचणी आल्या तरी या गावातील नागरिकांनी शिवा संघटनेला नेहमीच मदत करीत आलेत, या गावच्या ग्रामस्थानी संघटनेचा विचार पुढे नेण्याचे काम करून, पुढील येणाऱ्या काळात आपला शिवा संघटनेच्या कार्यकर्त्याला आमदार करण्याची शिवा संघटनेच्या कार्यकर्त्यात ताकत आहे आणि करुण दखावनार” असेही म्हणाले.
अखिल भारतीय वीरशैव युवक संघटना संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रीय अध्यक्ष मनोहर धोंडे बोलताना म्हणाले की “आजच्या दिवशी अचलेर येथे क्रांती झाली आहे. अचलेर हे संघर्षमय गाव आहे, आज 21 वर्ष पूर्ण झाले. आपली शाखा ही क्रांतिकारी शाखा आहे.17 सप्टेंबर 2001 रोजी अचलेर हे गाव गुंडाच्या तावडीतून गाव मुक्त झाले. ही चळवळ युवा पिढीला माहिती होणे गरजेचे आहे,जीवावर बेतली तरी समाजा सोबत शिवा संघटना कायम सोबत राहील व शिवा संघटनेला जो पक्ष सोबत घेऊन काम करेल त्याच्या सोबत शिवा संघटना काम करण्यास तयार आहे. व येणाऱ्या २०२४ ला लोकसभा २ जागा व विधानसभा १० जागा शिवा संघटना निवडणूक लढवायला तयार आहे.उमरगा लोहारा मतदार संघातुन शिवा संघटनेचे राज्य सरचिटणीस तथा माजी राज्यमंत्री बच्चु कडू यांचे स्वीय सहायक सातलिंग स्वामी यांचे नाव जाहिर करण्यात आले.


उमरगा-लोहारा मतदार संघातून विधानसभेची जोरदार तयारी करत असलेले मा सातलिंग स्वामी यांचे आमदारकीचे बिगुल वाजले असून,राज्यात वीरशैव लिंगायत समाजाचे लाखाच्या वर मताधिक्य असणारे ५० मतदार संघ असून जवळपास ४लोकसभा मतदार संघात या समाजाचे मताधिक्य आहे, तर राज्यात वीरशैव लिंगायत समाज सव्वाकोटीची लोकसंख्या आहे.
कर्यक्रमाचे सूत्रसंचालन भैरवनाथ कानडे यांनी केले. तर आभार सिद्धाराम भालके यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *