गडचिरोली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची परिसंवाद यात्रा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष माजी राज्यमंत्री तथा अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार मा.धर्मरावबाबा आत्राम यांच्या नेतृत्वाखाली कोरची तालुक्यातील कोटगुल ईथुन सुरु झाली असता तालुका कुरखेडा, वडसा, आरमोरी होवून गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील टेंभा या गावी राष्ट्रवादी काँग्रेस परिसंवाद यात्रेच्या पहिल्या टप्प्याचे समारोप करण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष माजी. राज्यमंत्री तथा अहेरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार धर्मराव बाबा आत्राम टेंभा ईथे परिसंवाद यात्रेला संबोधित करताना महणाले मागणी दोन वर्षे महाविकास आघाडी सरकारने कोरोना काळात सुमार कामगीरी केली या कामगीरी ची दखल अनेक देशांनी घेतली. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेती चे प्रंचड प्रमाणात नुकसान झाले परंतु योग्य रितीने पंचनामे न केल्यामुळे अजून प्रर्यत शेतकऱ्यांना शेतीची नुकसान भरपाई मिळालेली नाही आपण सातत्याने पाठपुरावा करत आहोत, आता प्रर्यत वाघाच्या हल्ल्यात २६ लोकांना ठार केले परंतु अजून सुद्धा वन विभाग झोपीत आहे तात्काळ वाघाचे बंदोबस्त करण्यात यावे तसेच दोन च व्यक्ती ना वाघाच्या हल्ल्यात नुकसान भरपाई मिळाली आहे बाकीच्या लोकांना लवकरात लवकर भरपाई देण्यात यावी,यासाठी आपण वारंवार मागणी करत आहोत.अनेक विकास कामे मार्गी लावलेली आहेत आणि अनेक उरलेली विकास कामे तात्काळ मार्गी लावणार होतो परंतु सरकार पडल्यामुळे ते शक्य झाले नाही व सर्व मंजूर कामाला शिंदे-फडणवीस सरकारने स्थगिती दिल्याने जिल्ह्यातील अनेक विकास कामे अडलेली आहेत.ही कामे मार्गी लावून पुर्ण करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत असे महणाले तसेच सुरजागड मध्ये पाच हजार लोकांना नौकरी दिली आहे, तसेच कोनसरी येथील लोह प्रकल्पात जिल्ह्यातील पंधराहजार बेरोजगार तरुणांना नौकरी देण्यात येईल यावेळी मा.आमदार साहेब यांना आश्वासन दिले.तसेच टेंभा गावा मध्ये सांस्कृतिक भवन लवकरात लवकर मंजूर करून देवु.राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर परिसंवाद यात्रेला संबोधित करतांना महणाले केंद्रातील मोदी सरकार खोटे आश्वासन देवुन आली तसेच राज्यातील सरकार ५० खोके घेऊन सत्ता स्थापन केलेली सरकार आहे.जनतेने यांच्या भुलथापाना बळी पडू नये देशात महागाई प्रंचड वाढलेली आहे परंतु बिजेपी सरकार महागाई चा म बोलायला तयार नाही . राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हाच सर्व सामान्य लोकांचे प्रश्न सोडविणारा एकमेव पक्ष आहे.टेंभा गावा मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस परिसंवाद यात्राचे नियोजन तसेच यशस्वी करण्यासाठी गडचिरोली तालुका अध्यक्ष विवेक बाबनवाडे तसेच प्रकाश ठाकरे यांनी परिश्रम घेतले.यावेळी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, तालुका अध्यक्ष विवेक बाबनवाडे,जिल्हा सचिव संजय कोचे, जिल्हा उपाध्यक्ष योगेश नांदगाये, फहिम भाई काजी, युवक जिल्हाध्यक्ष लिलाधर भरडकर, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष इंद्रपाल गेडाम, महिला सा.न्याय विभाग प्रमिलाताई रामटेके, विजेऐटी सेल जिल्हाध्यक्ष किशोर बावणे,ओबीसी सेल जिल्हा कार्याअध्यक्ष संजय शिंगाडे,टेंभा गावातील सरपंच सौ.सुनीता भजभुजे ताई ,उपसरपंच रामचंद्र कस्तुरे,ग्रा.पं.सदस्य मोरेश्वर वाकडे,मंगेश पिठाले,अमित बानबले,मिनाक्षी कुमरे,अरुणा चन्नेकर,तालुका संघटक सचिव प्रकाश ठाकरे ,राकेश ठाकरे, विलास ठाकरे बुथ कमेटी अध्यक्ष, राजु वेळ वेलादी,मंगेश लोढे,किशोर शिवणकर,आशीष उईके,मिथुन मडावी, आकाश मडावी, आदित्यनाथ वाघमारे, बबलु गंडाटे,राहुल गंडाटे, जिवन नैताम,योगाजी ठाकूर, झरकर,पितांबर नैताम, दिलिप भजभुजे, नरहरी भजभुजे, गुलाम गंडाटे, शुभंम समर्थ,प्रकाश भजभुजे,लालाजी कोलते, पुरुषोत्तम समर्थ,दुवेश ठाकरे, भिमराव ठाकरे, देविदास वाघाडे,शामराव ठाकरे, सिंधू गंडाटे, अर्चना गंडाटे, शेवंता गंडाटे, शोभा ठाकरे, मिना कुसराम,कोमल मडावी, कविता उईके तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मोठ्या संख्येने कार्यकर्ते परिसंवाद यात्रेला उपस्थित होते.