ऑटो चालक- मालक संघटनेनी मानले माजी आमदार दिपक दादा आत्राम यांचे आभार


गडचिरोली :आल्लापल्ली -अहेरी या रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे तात्काळ बुजविण्यात यावे म्हणून काल ऑटो चालक मालक संघटनेकडून आदिवासी विद्यार्थी संघाचे नेते व अहेरीचे माजी आमदार दिपक दादा आत्राम यांची भेट घेत त्यांना निवेदन देऊन या रस्त्यावरील खड्डे बुजविण्या संदर्भात संबंधित विभागाकडे पाठपुरावा करण्याची विनंती केले होते.यावेळी माजी आमदार आत्राम यांनी ऑटो चालक मालक संघटनेकडून प्राप्त निवेदनाची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.मेश्राम यांच्यासोबत भ्रमणध्वनी वरून संपर्क साधून आल्लापल्ली व अहेरी या रस्त्यावरील खड्ड्यांची समस्या त्यांचेकडे मांडत तात्काळ खड्डे बुजविण्याचे विनंती केले हो आल्लापल्ली व अहेरी सदर रस्त्या हे खड्डयांनी चाळणी झाल्याने या रस्त्याची दयनीय अवस्था पाहून अन माजी आमदार दिपक आत्राम यांचे विनंतीला मान देत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आजपासून खड्ड्यांमध्ये तात्पुरता मुरूम टाकून डागडुजी करण्याचे कामाला सुरुवात करण्यात आली आहे.येत्या पंधरा ते वीस दिवसात या रस्त्यावरील पडलेल्या खड्डे डांबरीकरनाने भरण्यात येईल असे संबंधित विभागाकडून सांगण्यात आले.याकामा संदर्भात माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी कार्यकारी अभियंता श्री.मेश्राम यांचे आभार मानले.
  आल्लापल्ली येथीलऑटो चालक मालक संघटनेनी माजी आमदारांनी त्यांच्या निवेदनाची दखल घेत कार्यकारी अभियंता श्री.मेश्राम यांच्याशी चर्चा करून संबंधित विभागाला तात्पुरता खड्डे बुजविण्याचे कामाला सुरुवात करायला भाग पाडल्याने ऑटो चालक -मालक संघटनेनी आविस नेते व माजी आमदार दिपक दादा आत्राम यांचे आभार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *