नांदेड : महाराष्ट्र शासनाने नुकतेच अद्यावत केलेल्या महावनगाव ई नोंदणी प्रणाली मध्ये गाव पातळीवरील ग्रामपंचायत केंद्र चालकांनी कशाप्रकारे कामे करावीत याबाबत नांदेड जिल्हा सीएससीचे मास्टर ट्रेनिंग ट्रेनर हणमंत बसवदे यांच्यामार्फ
आज दिनांक 06 ऑक्टोबर 2022 (गुरुवारी) नायगांव पंचायत समिती सभागृहामध्ये mahaonegov च्या माध्यमातून नमुना 1 ते 33 ची ई नोंद करणे या बाबद प्रशिक्षण देण्यात आले आहे .
सदरील प्रशिक्षण हे नायगाव तालुका पंचायत समिती आपले सरकार सेवा केंद्राचे व्यवस्थापक प्रकाश महिपाळे यांच्या नियोजनातून आयोजीत करण्यात आले होते . यावेळी प्रशिक्षक हणमंत बसवदे यांनी त्यांचे सहकारी केंद्रचालक अविनाश पावडे यांच्या मदतीने एलसीडी प्रोजेक्टर च्या माध्यमातून महावनगाव , महा ई ग्राम , आर डी डी महाऑनलाईन , नमुना नंबर 01 ते 33 विषयी सखोल मार्गदर्शन केले .
यावेळी शेषराव बेलकर , रामेश्वर पवार , गंगाधर गंगासागरे , संभाजी उपासे , विश्वंभर शिंदे , संभाजी पांचाळ , दिपक बच्छाव , हनुमंत कोरले , अनिल कांबळे, मालू झगडे , नागेश जाधव, शेख मौला, गजानन कदम, मारुती कदम , बालाजी मेहेत्रे , मलिकार्जुन कुंभार बालाजी वाघमारे, शैलेश जाधव, किरण हनुमंते , मीनाताई संगेपवाड , सविता मोरे , गंगासागर सज्जन , मसरत शेख यांसह तीस ग्रामपंचायतीचे केंद्र चालक उपस्थित होते .
