बीड – महाराष्ट्रातील धाकटी पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र चाकरवाडी येथे श्री संत ज्ञानेश्वर माऊली महाराज यांची समाधी आहे. आणि, या समाधीस्थळी नारळ आणि पेढे विक्रेते बसतात. नारळ सोललेले सालपट हे तेथेच पडतात. पावसाळ्यामध्ये या साल पटाचे खूप अशी घाण येते. या घाणीमुळे भावी भक्तांचे तसेच नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. पेढे याकरिता बांधलेले कॅरीबॅग या सुद्धा परिसरामध्ये अस्ताव्यस्त पडलेल्या असतात. वारंवार सांगून सुद्धा जशाचे तसेच या लोकांचे काम आहे. अनेक वेळा स्थानिक प्रशासनाने सूचना देऊन सुद्धा कचरा बंद होत नाही. छायाचित्रात दाखवलेले नारळाचा कचरा हा मंदिर परिसरामध्ये पडलेला आहे. लवकरात लवकर या कचऱ्याचा बंदोबस्त पेढे विक्रेते तसेच नारळ विक्रेते यांनी लावावा अशी चाकरवाडी ग्रामस्थ विवेक हजारे यांची मागणी आहे.
स्वच्छतेच्या बाबतीत स्थानिक प्रशासनाने सातत्याने प्रयत्न केले आहेत, पण अपेक्षित यश हे नारळ विक्रेते आणि पेढे विक्रेते यांच्यामुळे मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. नारळाच्या सालपटामुळे ठिक ठिकाणी दुर्गंधी आणि डासांची उत्पत्ती होत आहे.