बीड : दोन वर्षापासून कोरोनाच्या संसर्ग रोगामुळे गेवराई व्यापारी व नागरिक , त्रस्त आहेत त्यातच m.s.c.b कडून तातडीची वसुली मोहीम सुरू आहे, कोरोनामुळे काही घरांमधील व्यक्ती मरण पावले आहेत, तर काही लोकांचे हॉस्पिटल बिल पाच लाख झाले आहेत, अशा नाजूक परिस्थितीत नागरिक पूर्ण बिल भरतील कशी, अशा नाजूक परिस्थितीकडे एम एस ई बी अधिकारी दुर्लक्ष करत आहेत व प्रत्येक घराकडून सक्तीची वसुली करत आहेत, काही लोक अर्ध बिल भरण्यास तयार आहेत पण अर्ध बिल ते घेत नाहीत, अर्धा बिल भरणा का घेत नाहीत याचे कारण पण m.s.c.b अधिकारी देत नाही , गेवराई नगरीमध्ये भरपूर अशा गल्ल्या आहेत तिथे आकड्याचे प्रमाण जास्त आहे अशा गल्ल्यांमध्ये m.s.c.b अधिकारी कारवाई का करत नाहीत असा प्रश्न निर्माण होत आहे
