अंबाजोगाई-लातूर रोड बस व ट्रकची समोरासमोर धडक
10 गंभीर जखमी, जखमींवर स्वारातीत उपचार सुरू
बीड : अंबाजोगाई -लातूर रोडवरील बर्दापूर नजीक एसटी बस व ट्रकचा समोरासमोर भीषण अपघात झाला. रविवारी सकाळी झालेल्या या अपघातात सहा जण जागीच ठार झाले तर दहा पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले.

माहिती अशी की, लातूर- औरंगाबाद ही बस प्रवासी घेऊन अंबाजोगाई कडे येत होती तर ट्रक अंबाजोगाई हुन लातूरकडे जात होता. या दोन्ही वाहणांची बर्दापुर पासुन जेमतेम दोन किलोमिटर अंतरावर असलेल्या दुध डेअरी समोर जोराची धडक झाली.हा अपघात येवढा भीषण होता की, एसटी बस क्लिनर साईड ने जवळपास अर्धीहून अधिक फाटली. या अपघाताची माहिती मिळतात बर्दापुर पोलिस, ग्रामस्थांनी धाव घेत जखमींना अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रु ग्णालयात उपचारासाठी दाखल केले.या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. अपघात एवढा भीषण होता की मृतदेह बाहेर काढण्यासाठी क्र ेन ची मदत घ्यावी लागली.