– विधीसेवा समिती, वकील संघाचा पुढाकार
माजलगाव तालुक्यातील घळाटवाडी येथे विधी सेवा समिती व वकील संघाच्या संयुक्त विद्यमाने दि. 13 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी दहा वाजता कायदेविषयक शिबीर घेण्यात आले.
या शिबीराच्या अध्यक्षस्थांनी दिवाणी न्यायाधिश एस. डी. घनवट हे तर न्यायाधिश एम. ए. कुलकर्णी, न्यायाधिश आर. बी. पौळ, न्यायाधिश आर. एस. गोसावी, न्यायाधिश आर. ए. सावंत, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सिध्देश्वर हजारे, वकील संघाचे अध्यक्ष एस. के. गोंडे, सचिव श्री. घनघाव यांची उपस्थिती होती. यावेळी उपस्थित ग्रामस्थांना शेतीविषयक शासकीय योजनांची माहिती, महिलांचा कायदा, बाललैंगिक अत्याचार कायद्याची माहिती, मानवी तष्करी कायदा, राष्ट्ीय कन्या दिनाबाबतची माहिती, जागतिक मानसिक तणाव दिनाविषयी, जेष्ठ व्यक्तींचे अधिकार याव विषयी माहिती माहिती देण्यात आली. यावेळी गावचे सरपंच अनुप भाउ घाडगे, अॅड. अखिलेश घाडगे, जेष्ठ विधिज्ञ पी. टी. तौर, ग्रामपंचाय सदस्य, ग्रामसेवक पाटील, पंडित ढगे, तलाठी आर. यु. इंगळे यांचेसह ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या.