चंद्रपूर (सतीश आकुलवार) चंद्रपूर : आम आदमी पार्टी भद्रावती तर्फे आज दि.16 ऑगस्ट 2021 ला आम आदमी पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा संयोजक अरविंद केजरीवाल जी आणी चंद्रपुर जिल्ह्याचे संघटन मंत्री मा.श्री. परमजीत सिंह झगळे साहेब यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे कार्यक्रम घेण्यात आला.. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रपुर जिल्ह्याचे संघटन मंत्री मा.परमजीत सिंह झगळे साहेब आले या वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रतिमेला हार अर्पण करण्यात आले व नगर परिषद भद्रावती चे सफाई कर्मचारी यांचा फुल देऊन सत्कार करण्यात आला… नगर परिषद सफाई कर्मचारी यांचा उपस्तीथी मधे केक कापुन वाढदिवस साजरा करण्यात आला…. व त्याना चाय व मिठाई वाटण्यात आली… त्या नंतर भद्रावती पुलिस स्टेशन, ग्रामीन रुग्णालय भद्रावती व विविध ठिकानी वृक्ष रोपन चा कार्यक्रम घेण्यात आला… आम आदमी पार्टी चे राष्ट्रीय संयोजक मा. श्री. अरविंद केजरीवाल जी यांचे काम बघुन भद्रावतीचे अजय नेहारे, रमण भाऊ, पवन गंधेवार रा. किल्ला वार्ड, व असंख्य नागरिकांनी पक्ष प्रवेश केला…. या वेळी उपस्थित पदाधीकारी जिल्ह्याचे संघटन मंत्री मा. श्री.परमजीत सिंह झगळे, तालुका अध्यक्ष सोनाल पाटिल, तालुका उपाध्यक्ष विनित निमसटकार, तालुका सचिव सुमीत हस्तक, तालुका कोषाध्यक्ष राजकुमार चट्टे, मृणाल खोब्रागळे, सुरज शहा, राजू कोटा, दीपक वनकर, नावेद शेख़, राजेंद्र भुक्या, प्रकाश कांबळे, घनशाम गेडाम साहेब होते.