औरंगाबाद : वाळूज महानगर, पुढारी वृत्तसेवा: बजाजनगर येथे ‘गरुडझेप संचालित जनसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष नीलेश सोनवणे व प्रा. डॉ. सुरेश सोनवणे आयोजित समाज उपयोगी विविध उपक्रमांचा केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. यावेळी २४ तास रुग्णांच्या सेवेत उपलब्ध असणाऱ्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले.
बजाजनगरसह परिसरात गेल्या काही महिन्यांपासून गरुडझेप संचालित जनसेवा फाउंडेशनच्या वतीने विविध समाज उपयोगी उपक्रम राबविले जात आहेत. सावरकर मैदानावर कार्यक्रम आयोजित करून केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते विविध उपक्रमांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी डॉ. कराड यांच्या हस्ते गरजू नागरिकांना ३ हजार ई- श्रम कार्ड व ३ हजार आयुष्यमान हेल्थ कार्डचे वाटप करण्यात आले. तसेच २४ तास अविरत सेवा देणाऱ्या रणवाहिकेचे उद्घाटन करण्यात आली. यावेळी डॉ. कराड यांनी शासनाकडून महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी लघु, कुटीर उद्योग अंतर्गत अर्थसाहाय्य करण्यात आले. प्रास्ताविक प्रा. सुरेश सोनवणे यांनी तर आभार फाउंडेशनचे अध्यक्ष माजी सैनिक नीलेश सोनवणे यांनी केले. कार्यक्रमाला भाजपा प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर, माजी उपमहापौर राजू शिंदे, तालुका अध्यक्ष वसंत प्रधान, ग्रा. पं. सदस्य संभाजी चौधरी, दीपक बड़े, राजू अवतारे, प्रकाश चौधरी, शत्रुघ्न देशमुख, गजानन नांदूरकर, लक्ष्मण लांडे, सुनीता जोशी उपस्थित होते.
प्रतिनिधी:- अनिकेत घोडके
NTV न्युज मराठी, वाळुज औरंगाबाद.
मो.8484818400