उस्मानाबाद तालुक्यातील येडशी येथील भारतीय जनता पार्टीचे तालुका सरचिटणीस गजानन भैया नलावडे यांनी आमदार राणा जगजीत सिंह पाटील व भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष नितीन काळे यांच्याकडे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तेरणा चारगाव पाणी पुरवठा योजना सुरू करण्याबाबत येडशी बस स्टॅन्ड ते लातूर रोड भीम नगर पर्यंत मेन बंदिस्त गटार साठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत येडशी राज्य महामार्ग 77 ते येडशी चोराखळी रस्ता ग्रामीण मार्ग 6 या रस्त्याच्या काम पूर्ण करण्यास निधी उपलब्ध करुन देण्याबाबत तसेच रामलिंग मंदिर रोड ते ठाकर वस्ती वैद वस्ती या रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत आज मागणी साठी निवेदन देण्यात आले ह्या सदरील कामे येडशी तील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे असून यांची आपण त्वरित दखल घेऊन प्रशासनास कार्यवाही करण्यास सहकार्य करावे अशी मागणी गजानन भैय्या नलावडे यांनी आज मागणी केली यावेळी अशोक देशमुख अध्यक्ष भाजपा येडशी शाखा बाजीराव देशमुख अनिल कोरे ग्रा.प सदस्य यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते
प्रतिनिधी रफिक पटेल
येडशी उस्मानाबाद
