वाशिम-दिनांक १७/०८/२०२१ रोजी फिर्यादी संतोष रामचंद्र वाघमारे वय ३३ वर्ष रा.गारखेडा ता.सेनगांव जि.हिंगोली यांनी पोस्टे वाशिम शहर येथे तक्रार नोंदविली की, यातील फी हा दि.०३/०२/२०२१ रोजी वाशिम येथे त्यांची मोटारसायकल क्रमांक एम.एच.३८ यु ४८४६ हि घेवुन आले असता पाटणी चौक वाशिम येथे त्यांच्या गाडीची पेट्रोल नळी तुटल्याने ते गाडी उभी करून पेट्रोल नळी आणण्यासाठी गेले असता कोणीतरी
अज्ञात चोरटयाने वरील मोसा कि.४०,००० रू ची चोरून नेली अशा रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन वाशिम शहर येथे अप.क.१२२५/२१ कलम ३७९ भादविचा दाखल करण्यात आला.मा. पोलीस अधिक्षक श्री. वसंत परदेशी सो यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पोलीस
निरीक्षक यांनी सदर गुन्हयाचे तपासाबाबत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास आदेश देवुन रवाना केले असता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनिय माहितीच्या आधारे आरोपी नामे १) कार्तिक महादेव सातपुते रा.काळेफेल वाशिम २) दत्ता महादेव काळे रा.गोंदेश्वर वाशिम ३) चंदु बळीराम खिल्लारे उर्फ शेख इम्रान इस्माइल सर्व रा. पाळेश्वर मंदिर जवळ वाशिम यांना मोटरसायकल गुन्हयाचे संदर्भात सखोल विचारपुस केली असता TVS Sport कि ४००००/- रू ची मोसा चोरल्याचे कबुल केले व सदर मोसा त्यांचे कडुन हस्तगत
करून पुढील तपास कामी नमुद आरोपी व मोटारयसायकल पोलीस स्टेशन वाशिम शहर यांच्या ताब्यात दिली.अशा प्रकारे मा. पोलीस अधिक्षक श्री वसंत परदेशी, अपर पोलीस अधिक्षक श्री विजय कुमार चव्हाण यांचे मार्गदर्शनात दाखल मोसा च्या गुन्हयाचा पोलीस निरीक्षक शिवाजी ठाकरे,सपोनि अतुल मोहनकर,विजय जाधव,अजयकुमार वाढवे,सपोउपनि सुनिल पवार,राजेश राठोड,प्रशांत राजगुरू,अमोल इंगोले, पोकाँ प्रविण राउत,आश्विन जाधव, राजेश गिरी, निलेश इंगळे, संतोष शेणकुडे, चालक संदीप डाखोरे,शाम इंगळे यांनी तपास करून उलगडा केला आहे. नमुद गुन्हयाचा पुढील तपास पोलीस स्टेशन वाशिम शहर हे करीत आहेत.
प्रतिनीधी-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206