महात्मा फुले,सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे सोमवार दि.२८ नोव्हेंबर २०२२ रोजी शिवाजीनगर,पुणे येथील बालगंधर्व रंगमंदीरात आयोजन करण्यात आलेले आहे.
कार्यक्रमाचे निमंत्रक रविंद्र ढमढेरे ,लेक्चरर रमेशराव बांडे यांनी ही माहिती दिली.

नाटककार,अभिनेता,लेखक ज्ञानेश महाराव यांच्या हस्ते गुणवंत शिक्षक पुरस्काराचे वितरण केले जाणार असून आमदार,डॉ.जितेंद्र आव्हाड, माजी खासदार राजू शेट्टी कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहाणार आहेत.
सोमवार दि.२८ नोव्हेंबरला सकाळी साडेअकरा वाजता कार्यक्रमास सुरूवात होणार असून ऍड. श्रीकांत शिरोळे, डॉ.पी.ए.इनामदार, रविंद्र सावंत ,प्रा.डॉ. दिगंबर दुर्गाडे, प्रा.डॉ.सुधाकर जाधवर, प्रमिला गायकवाड, डॉ.जयेश काटकर ,बळीराम बडेकर ,डॉ. सी.टी.कुंजीर, ,डॉ.श्रीमंत कोकाटे या़ंच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडणार असून महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनी आपल्या देशात प्रथमत: सार्वजनिक आणि मोफत शिक्षणाचा पाया घातला.त्यामुळे त्यांच्या नावाने महात्मा फुले,सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आल्याचे कार्यक्रमाचे निमंत्रक रविंद्र ढमढेरे, लेक्चरर रमेशराव बांडे यांनी सांगितले.
एन टी व्ही न्यूज मराठीसाठी
प्रतिनिधी :- विजय ढमढेरे कोंढापुरी ता.शिरूर जि.पुणे 8975598628