दुसर्याच्या नावे असलेल्या रजिष्टर नंबरचा गैरवापर करणार्या झोलाछाप डाॅक्टरवर 420 चा गुन्हा नोंदवण्याची मागणी
वाशिम:-मंगरुळपीर तालुक्यातील शेलुबाजार येथील एका झोलाछाप मुन्नाभाई डाॅक्टरवर पथकाने पाञता नसतांनाही अवैधरित्या दवाखाना चालवत असल्याचे निष्पन्न झाल्याने विविध कलमान्वये गुन्हे नोंदविन्यात आले.त्यांचेकडुन काही औषध व साहित्यही जप्त करण्यात आले आहे.असे असतांना माञ सबंधित व्यक्तीने जो दवाखाना चालवतांना रजिष्टर नंबर वापरला तो इतरांच्या नावाने रजिष्टर असल्याची विश्वसनिय सुञाकडुन माहीती मिळाली आहे त्यामुळे दुसर्यांच्या रजिष्टर नंबरचा गैरवापर करणार्या मुन्नाभाई झोलाछाप डाॅक्टर 420 अंतर्गतचे कलम लावावे अशी मागणी आता जोर धरत आहे.

मंगरुळपीर शहरासह शेलुबाजार व इतरही काही गावात झोलाछाप बोगस डाॅक्टर आपले अवैधरित्या बस्तान मांडुन बसले आहे.या झोलाछापमुळे रुग्नांच्या जीवाशी खेळ राजरोसपणे सुरु आहे.वाशिमचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी यांनी या बोगस डाॅक्टरविरोधात कारवाईची मोहीम सुरु करुन आरोग्य पथकेही नियुक्त केलीत.या पथकामार्फत काही ठिकाणी बोगस डाॅक्टरवर कारवायाही झाल्यात तरीही अजुन झोलाछाप डाॅक्टर आपले दवाखाने ऊघडुन पैशासाठी रूग्नाच्या जीवाशी खेळत असल्याचे निदर्शनात येत आहे.भरारी पथकाने अशा झोलाछापचा वेळीच बंदोबस्त करुन कारदेशीर कारवाईचे वरिष्ठांचे आदेश असतांनाही स्थानिक पातळीवर कारवाईची अनास्था दाखवल्या जात असल्याची चर्चा आहे.काही दिवसापुर्वी डाॅक्टर अशोशियेशनने तालुक्यातील संशयीत बोगस डाॅक्टरची नाव आणी लोकेशनसह यादीच वेळोवेळी प्रशासनाला सादर करुनही कारवाई का केली जात नाही असा प्रश्न आता तालुकावाशीयांना पडलेला आहे.विश्वसनिय सुञाकडुन मिळालेल्या माहीतीनुसार डाॅक्टर अशोशियेशन व सुज्ञ नागरीकांच्या तक्रारीनंतर शेलुबाजारच्या ‘त्या’ झोलाछाप मुन्नाभाईवर कारवाई करण्यात आली पण थातुरमातुर कलमे लावुन प्रकरण सैल करण्याचा प्रकार प्रशासनाकडुन झाल्याचा लोकांकडुन आरोप होत आहे.मिळालेल्या माहीतीनुसार सदर व्यक्तीने दवाखाना चालवतांना आणी लेटरपॅडवर जो रजिष्टर नंबर वापरला तो आधीच दुसर्याच्या नावे रजिष्टर असल्याचे कळते.अशा दुसर्या व्यक्तीचा रजिष्टर नंबर वापरुन दवाखाना चालवणे कायद्याच्या विरुध्द आहे.कारवाई करतांना प्रशासनाने या बाबी विचारात घेवुन दुसर्याच्या रजिष्टर नंबरचा गैरवापर करणार्या विरुध्द 420 नुसार गुन्हा नोंदवणे आवश्यक असतांना तसे करण्यात आले नसल्याची चर्चा रंगत आहे.आतातरी वरिष्ठ प्रशासनाने या बाबीची शहानिशा करून त्यानुसार कलमे नोंदवावीत अशी मागणी आता जोर धरत आहे.
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरूळपीर/वाशिम
मो.8459273206