वाशीम: महामार्गावर महिलांसाठी स्वछतागृह नसल्याने महिलांची कुचंबणा होत असल्याचे एकंदरीत चिञ असल्याने चित्रा वाघ यांनी याविषयी नाराजी व्यक्त करत सरकारसमोर प्रस्ताव मांडणार असल्याची माहीती दिली आहे.
महिलांची होणारी घुसमट दूर करण्यासाठी रस्त्याच्या कडेला महिलांसाठी स्वच्छतागृहे बांधण्याचा प्रस्ताव सरकारकडे मांडणार असेही वाशिम येथील पञकारपरिषदेत सांगीतले. महामार्गावर महिलांसाठी स्वछतागृह नसल्याने महिलांची कुचंबणा होत आहे. चित्रा वाघ यांनी याप्रकरणी नाराजी व्यक्त करत लवकरच सरकारसमोर प्रस्ताव मांडणार असल्याचेही सांगीतले आहे.यासंदर्भात भाजप महिला प्रदेश चित्रा वाघ वाशिम येथे पत्रकार परिषदेत बोलताना सांगीतले.राज्यात अनेक सरकारे आलीत आणि गेलीत मात्र, महिलांचे प्रश्न आजही कायम आहेत. लाखो रुपये खर्चून मोठ-मोठे रस्ते बांधण्यात आले. परंतु कोणत्याही महामार्गावर महिलांसाठी स्वच्छतागृहेच नाही. यामुळे प्रवासादरम्यान महिलांची मोठी कुचंबणा होते. याचा प्रत्यय सत्ताधारी पक्षातील भाजप महिला प्रेदश अध्यक्षा चित्रा वाघ यांना आला. महिलांची होणारी घुसमट दूर करण्यासाठी रस्त्याच्या कडेला महिलांसाठी स्वच्छतागृहे बांधण्याचा प्रस्ताव सरकारकडे मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206