नागपूर : २६ नोव्हेंबर हा स्वतंत्र भारताच्या इतिहासातील एक विशेष दिवस आहे. या दिवशी देशभरात संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. २६ नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.२६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारताने औपचारिकपणे संविधान स्वीकारले. हे संविधान २६ जानेवारी १९५० रोजी लागू झाले.भारतीय संविधान तयार करण्यासाठी एकूण दोन वर्षे ११ महिने आणि १८ दिवस लागले. आपल्या संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकाला स्वतंत्र भारतात राहण्याचा समान अधिकार दिला आहे. पाश्चिमात्य संस्कृतीच्या युगात देशातील तरुणांमध्ये संविधानाची मूल्ये रुजवणे हा संविधान दिन साजरा करण्यामागचा एकमेव उद्देश आहे.

आपल्या देशाच्या संविधानाच्या निर्मितीमध्ये डॉ. भीमराव आंबेडकर यांचा सर्वात महत्त्वाचा वाटा होता. त्यामुळे त्यांना आदरांजली वाहण्याचे प्रतीक म्हणूनही संविधान दिन साजरा केला जातो. आज शनिवार दिनांक 26/11/2022 रोजी सकाळी 11:55 वाजता 210 मेगावात .. प्रवेशद्वार येथे संविधान दिवस श्री.अरुण पेटकर, उप मुख्य अभियंता, 210 मे.वॅ. यांच्या अध्यक्षते मध्ये साजरा करण्यात आला.याप्रसंगी श्री.अरुण पेटकर, उप मुख्य अभियंता, 210 मे.वॅ. यांच्या शुभहस्ते संविधान निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून पूजन करण्यात आले. *यानंतर सामूहिकरित्या संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. त्या वेळी प्रमुख उपस्थिती डॉ.अनिल काठोये, उप मुख्य अभियंता (प्रशासन). श्री.जितेंद्र टेंभरे, उप मुख्य अभियंता 500 मे.वॅ. श्री. संजीवकुमार पखान, अधीक्षक अभियंता. श्री.प्रविण रोकडे, अधीक्षक अभियंता, कोळसा हाताळणी विभाग 500 मे.वॅ. श्री.उमेद शामकुवर, अधीक्षक अभियंता, कोळसा हाताळणी विभाग 210 मे.वॅ. श्री. विश्वास सोमकुवर, अधीक्षक अभियंता, 500 मे.वॅ. डॉ.अमित ग्वालवंशी, वैद्यकीय अधीक्षक. श्री.देवेंद्र राठोड, वरिष्ठ व्यवस्थापक सुरक्षा.
श्री.उमेश ढोक, सुरक्षितता अधिकारी. यासमवेत विभागप्रमुख, अधिकारी, अभियंते, कर्मचारी, कंत्राटी कामगार व संघटना प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्री. अमरजीत गोडबोले, कल्याण अधिकारी (प्र.) यांनी केले.
प्रतिनिधी विनोद गोडबोले खापरखेडा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *