वीज केंद्राच्या प्रकाशनगर वसाहतीत असलेल्या शंकरराव चव्हाण विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील कबड्डी पटू १९ वर्षीय वयोगटात आंतरशालेय क्रिडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करीत सावनेर तालुक्यात अव्वल ठरले असून जिल्हा स्तरीय स्पर्धत प्रवेश निश्चित केला आहे

नुकत्याच वाकोडी येथे आंतरशालेय क्रिडा स्पर्धा पार पडल्या १९ वर्षीय वयोगटातील कबड्डी स्पर्धेत साबीर शेख यांच्या नेतृत्वाखाली रितीक चौरे, अभिजित ढोके, ईर्षात शाह, रक्षित पाटील, सौरभ आग्माची, सुशील बोन्द्रे, सतीश बागडे, वंश बागडे, अरबाज खान आदि खेळाडूंनी भाग घेतला.
विभागीय क्रीडा संकुल मानकापूर येथे होणाऱ्या “जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत शंकरराव चव्हाण विद्यालयाचे कबड्डीपटू भाग भाग घेणार असून त्यांना सेवानिवृत्त क्रिडा शिक्षक विपीनकुमार शर्मा यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले तालुका स्तरावर विद्यालयातील कबड्डीपटूंनी यश संपादन केल्यामूळे त्याचे मुख्याध्यापक विमलप्रकाश मिश्रा, उपमुख्याध्यापक डॉ श्रीकांत पारखी, पर्यवेक्षक गणेश चिखले, प्राध्यापक आशिष चिटमुलवार, सचिन कोरडे, चंद्रकांत गायकवाड, प्रविण साबळे, अरुण अंजनकर, कैलाश तभाने, उमेश झाडे, संगीता राऊत, किशोर बक्सरिया, सुनील जालंदर, अभय मिश्रा, यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले असून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
प्रतिनिधी विनोद गोडबोले खापरखेडा