तळणी येथे वीर भगतसिंग हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन

जालना : मंठा तालुक्यातील तळणी येथे भव्य हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन मंठा तालुका बाळासाहेबांची शिवसेना तालुका अध्यक्ष श्री उदय दादा बोराडे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले उद्घाटन प्रसंगी बोलताना बोराडे म्हणाले की खेळाने व्यक्तीच्या नकारात्मक ऊर्जा दूर होतात आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त होऊन आत्मविश्वास मजबूत कुशल होऊन मानसिक आणि शारीरिक विकास चरित्र निर्माण करीता खेळ खेळाच्या स्पर्धा फार महत्त्वाच्या भूमिका बजावतात यामुळे खेळाने मानसिक शारीरिक विकास होतो. यावेळी उपस्थित शिवसेना तालुकाप्रमुख उदयदादा बोराडे, भीमशक्ती संधटना तालुका आध्यक्ष गौतम सदावर्ते, राष्टवादी युवक उप जिल्हाध्यक्ष माऊली सरकटे,भाजपा युवा मोर्चा अध्यक्श नीतीन सरकटे, शिवमुद्रा प्रतिष्ठान तळणी आध्यक्ष कृष्णा सरकटे, सुधाकर सरकटे, नीलेश राऊत, नाथा राजपुत,गजानन कापसे, ॲड. राजेश खरात,लिंबाजी बोराडे,रितेश सरोदे,विकास मोरे, व अन्य.

पुढे बोलताना उदयदादा बोराडे म्हणाले आज सर्व सक्षम खेळाडू सचिन तेंडुलकर, मिल्खा सिंग, सानिया मिर्झा, सायना नेहवाल, अभिनव बिंद्रा, विराट कोहली, कपिल देव, महेंद्रसिंग धोनी आपल्या खेळ श्रमाच्या बळावर परखड मेहनतीच्या जोरावर आत्मसमर्पण दृढ विश्वासाच्या जोरावर प्रतिष्ठित व्यक्तीच्या रूपामध्ये विश्व प्रख्यात आहेत. खेळाचे महत्व जाणून खेळाडूंनी खेळ भावना जपत खेळामधून पुढे येऊन मंठा तालुक्याचे नाव उज्वल करावे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *