जालना : जिल्ह्यातील टेंभुर्णी येथील विस हजार लोकवस्ती शहरातील जुन्या काळातील.. वेंशीची रंगरंगोटी करण्यासाठी सरपंच सौ सुमनताई म्हस्के यांच्या..विशेष सहकार्याने स्थानिक विकास निधीतून हे काम करण्यात येत आहे.. सदरील रंगरंगोटी चे गौतम म्हस्के यांच्या मार्फत कपिल जाधव पुंजाराम ढगे.या पेंटरने गावातील सार्वजनिक ठिकाणी वेगवेगळ्या म्हणी सुविचार.. छायाचित्रे काढून गावातील स्वच्छतेचा संदेश देणारे संदेश लिहून ऐन श्रीदत्त यात्रेच्या निमित्ताने परगावी असलेल्या टेंभुर्णी करांना यात्रेनिमित्त येणाऱ्या नागरिकांचे स्वागत बोर्ड तयार करण्यात आले. निजाम कालीन जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी ही रंगरंगोटी करून आदर्श गाव , म्हणून परिचय होईल अशी अपेक्षा गौतम म्हस्के यांनी यावेळी बोलून दाखवली… या गावातील शेकडो वर्षांपासून चालत आलेल्या दत्तात्रय महाराज यात्रेच्या निमित्ताने यावर्षी कबड्डी सारख्या खेळाची सुरुवात केली आहे तर लोकमंनोरंजानासाठी सिनेमा ग्रूह लहान मुलांना पाळणा लोककला म्हणून तमाशा चे फड मालकाना सुध्दा मोफत परवानगी देण्याची हमी दिली… यात्रेत आलेल्या सर्वांना करमुक्त… यात्रा महोत्सव साजरा करण्यात येणार आहे… यामुळे गावातील वातावरणात उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे… येणाऱ्या सर्व भाविकांची ग्रामसंसद च्या वतीने स्वागत कमान सुध्दा उभरणार आहे.. सर्व संचालक ग्रामविकास अधिकारी जगदीश आढाव उपसरपंच मनिषाताई पाचे संतोष पाचे यांचे सहकार्य लाभले…