जालना शहरातील ग्रंथ संग्रहालय श्रीराम वाचनालयाला एन टी.व्ही. न्यूज चैनलचे संपादक इकबाल शेख यासह रजत दाईमा (अहमदनगर), रमेश नेटके,जाबेर हुसेन पठाण (धावडा-भोकरदन),संतोष तळपे (घनसावगी),रावसाहेब अंभोरे (टेंभुर्णी),नाझीम मनियार(जालना),फेरोज अहेमद (जालना),आनंद इंदानी (बदनापुर),किशोर सिरसाठ(बदनापुर) या जालना जिल्ह्यातील प्रतिनिधीनी भेट दिली. याप्रसंगी ग्रंथालयीन कामकाजाची माहिती तसेच सार्वजनिक ग्रंथालयाच्या अत्यल्प
अनुदानासंबंधी,कर्मचारीवर्गाच्या प्रश्नासंबंधी व सार्वजनिक ग्रंथालयाच्या प्रदीर्घ काळापासून प्रलंबित समस्यांविषयी ग्रंथपाल शाम शेलगावकर यांनी सविस्तर माहिती दिली.
श्रीराम वाचनालय गेल्या ६३ वर्षापासून ज्ञानदानाचे कार्य सुव्यवस्थितपणे करीत आहे परंतु शासनाचे धोरण उदासीनतेचे आहे. या बाबत इकबाल शेख यांनी खंत व्यक्त केली. या प्रसंगी इकबाल शेख यांनी इन्साफ रमजान विशेषांक ग्रंथालयास भेट दिला. यावेळी शैलेंद्र बदनापूरकर,प्रमोद जोशी,पांडुरंग काळे यांची उपस्थिती होती.