घनसावंगी/प्रतिनिधी :- मच्छिंद्रनाथ चिंचोली येथिल श्री.मनोहर धबडकर यांची कन्या कुमारी नंदाताई धबडकर हिचा नाशिक येथील सप्तशृंगी मेडिकल कॉलेजमध्ये एम.डी.(बालरोगतज्ज्ञ)या पदासाठी निवड झाली असून या निवडीबद्दल तिचा मच्छिंद्रनाथ चिंचोली येथिल आयुवैद तज्ञ योगिराज डॉ.कैलासनाथ महाराज हेमके यांच्या निवासस्थानी तिचा व तिचे आई-वडील यांचा सत्कार करुन तिला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या या वेळी योगिराज कैलासनाथ महाराज यांचे कुटुंबातील सर्व सदस्य सह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.तिने यापुर्वी शेवगाव जिल्हा अहमदनगर येथे बी.ए.एम.एस.चे शिक्षण पूर्ण केले असून ती आता एम.डी.(बालरोगतज्ज्ञ)या शिक्षणासाठी नाशिक येथे पुढील शिक्षणासाठी गेली असुन या यशाबद्दल तिचे मच्छिंद्रनाथ चिंचोली सह घनसावंगी तालुक्यातुन सर्वत्र अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे