अंबड / प्रतिनिधी- धनगर समाजाच्या न्याय हक्कासाठी लढणारी संघटना म्हणून ओळखली जाणारी संघटना म्हणजे युवा मल्हार सेना या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू दादा देवकाते यांनी अंबड येथील धनगर समाजाचे नेते सुरेश भावले यांची युवा मल्हारनेच्या प्रदेशाध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे.
बीड येथे संपन्न झालेल्या प्रदेश कार्यकारणी बैठकीमध्ये सर्वानुमते सुरेश भावले यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली यावेळी श्री देवकाते म्हणाले की धनगर समाज हा महाराष्ट्रात लोकसंख्येने दोन नंबरला असून राजकीय सामाजिक व शिक्षण क्षेत्रामध्ये हा समाज मागासलेला आहे समाजातील ५०% लोक हे अशिक्षित असून अतिशय हालाकीचे जीवन जगत आहे समाजातील सुशिक्षित व समृद्ध लोकांनी पुढे येऊन समाजातील मागासलेल्या लोकांच्या न्यायाक्कासाठी लढले पाहिजे.
व त्यासाठी युवा मल्हार सेनेच्या माध्यमातून काम करणार आहे. तसेच यावेळी नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष सुरेश भावले म्हणाले की प्रत्येकाने आपण ज्या जातीमध्ये व ज्या मातीमध्ये जन्मला आलो त्या जातीसाठी व मातीसाठी काम केले पाहिजे कारण ज्या जातीत व मातीत जन्मलो त्याचे ऋण फेडने आपले प्रथम कर्तव्य असते सातत्याने धनगर समाज व धनगर आरक्षण यावर अनेक मोर्चा आंदोलने झाली पण पाहिजे त्या प्रमाणात या मोर्चा आंदोलनांना यश आले नाही व सध्या तर धनगर समाजाला आरक्षणाचा मुद्दा विसरून गेल्यासारखा झाला आहे आता परत एकदा आरक्षणाच्या मुद्दयावर वनवा पेटवण्याची गरज आहे आणि त्यासाठी आता आपण महाराष्ट्रभर दौरे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.