सापडलेली रोख रक्कम आणि कागदपत्रे केली परत .
जालना : भोकरदन तालुक्यातील धावडा येथील पत्रकार हरी बोऱ्हाडे रविवारी सायंकाळी वालसावंगी ते पारध या रस्त्यावरून वरून जात असताना वालसावंगी ते पदमावती रस्त्यावर कोणाचे तरी पॉकेट , बँकेचे कागदपत्र ,आधारकार्ड , बँक पासबुक , पॅनकार्ड आदी महत्वाचे कागदपत्र व रोख साडेतीन हजार रुपये पडेलेले दिसले बोऱ्हाडे यांनी सदर कागदपत्र आणि रोख साडे तीन हजार उचलले माञ अंधार असल्यामुळे ते कोणाचे आहे हे त्यांना कळले नाही.
त्यांनी सरळ पारध पोलीस ठाणे गाठून ते कागदपत्र व रोख रक्कम पोलिसांकडे जमा केले. पोलिसांनी सापडलेल्या कागदपत्राची शहानिशा केली असता ती रोख रक्कम आणि कागदपत्र पिंपळगाव रेणुकाई येथील रहिवाशी विजय कडूबा बेराड या तरुणाचे असल्याची खात्री केली व पोलिसांसमक्ष ती रोख रक्कम आणि कागदपत्र बेराड यांना परत केले.पत्रकार बोऱ्हाडे यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणा बद्दल पारध पोलीस ठाण्याचे स. पोलीस निरीक्षक अभिजीत मोरे यांनी त्यांचे कौतुक करून शाल श्रीफळ देऊन बोऱ्हाडे यांचा सत्कार केला.