वाटूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथील दोन डॉक्टर असतांना ही डॉक्टरांचा मनमानी कारभार
परतुर तालुक्यातील वाटुर येथील आरोग्य केंद्रांत राञीच्या वेळी डॉक्टर हे आरोग्य केंद्रांत हजर रहात नसल्याचे दिसुन आले. सविस्तर माहिती अशी कि दि.०३/१०/२०२२ सोमवार रोजी रात्री साडे नऊ च्या सुमारास संभाजी संजय पारखे यांना घरातील काम करीत असतांना विजेचा शॉट लागला असता त्यांना वाटुर येथील आरोग्य केंद्रांत आणंल पण आरोग्य केंद्रांस कुलुप लावलेल होत गेट पाशी जावुन आवाज दिला तर आतमध्ये एक कर्मचारी होते.त्यांच्याकडुन सांगण्यात आले कि डॉक्टर हजर नाहीत डॉक्टर अंजु वाघमारे यांच्या शी संपर्क साधन्याचा प्रयत्न केला पण त्यांचा मोबाईल स्विच ऑफ होता व दुसरे डॉक्टर आमोल भताने यांच्या शी संपर्क सादले आसता ते घरी मंठा येथे आहे अशी माहिति मिळाली म्हणुन सदरील पेंशटला जालना येथे हलवण्यात आले.
वाटुर येथील आरोग्य केंद्रांत डॉक्टर हजर राहत नसल्याने परिसरातील नागरिकांची गैर सोय होत आहे.व नागरिकांतुन संताप व्याक्त केला जात आहे. आरोग्य केंद्र असुनही जर त्याचा उपयोग जनतेसाठी होत नसेल तर त्याचा असुनहि उपयोग काय ? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.