पुणे : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य व जिल्हा क्रीडा परिषद, पुणे अंतर्गत शिरूर येथील चांदमल ताराचंद बोरा कनिष्ठ महाविद्यालयात मंगळवार दि.६ डिसेंबरला पार पडलेल्या मुलांच्या तालुकास्तरीय आंतर शालेय मैदानी स्पर्धेत आर एम धारिवाल विद्यानिकेतन प्रशाला व ज्युनिअर कॉलेज, कोंढापुरी येथील तीन विद्यार्थी जिल्हा स्पर्धेसाठी पात्र ठरले.
विद्यानिकेतन प्रशालेचे प्राचार्य संजयकुमार गजऋषी यांनी ही माहिती दिली.
१ )वयोगट १७ (मुले) -थाळी फेक – रविकुमार रामू हरिजन ( प्रथम क्रमांक ),
२ )वयोगट १९( मुले) -गोळा फेक अक्षय दयाराम पाटील ( द्वितीय क्रमांक ),
३ ) वयोगट १९( मुले)- भाला फेक – विश्वजीत कानिफनाथ जगदाळे (द्वितीय क्रमांक ).
स्पर्धेतील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, त्यांचे मार्गदर्शक शिक्षक प्रा. भोजने व त्यांच्या टीमचे विद्यालयाचे मुख्याध्यापक संजयकुमार गजऋषी,शिक्षक प्रा.आनंदा धोंडे, प्रा.बापू खारतोडे,पत्रकार विजय ढमढेरे ,शिक्षकेतर कर्मचारी, शालेय शिक्षण समिती व ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
