पुणे : इंदापूर शहरातील आय कॉलेज समोर उसाच्या ट्रॅक्टर खाली आल्याने एका शाळकरी अनाथ मुलीचा जीव गेला आहे. काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचे ट्रॉली हायवेवर पलटी झाली होती पण सुदैवाने त्यावेळी कोणाचाही जीव गेलेला नव्हता. पण त्याचवेळी जर प्रशासनाने दखल घेतली असती तर आज एका चिमुकलेला आपला जीव गमवावा लागला नसता.वारंवार प्रशासनाला निवेदने देऊन बातमी प्रसिद्ध करून देखील इंदापूर प्रशासन जाणून बुजून डोळ्यावर पट्टी टाकून झोपल्याचे चित्र इंदापूर मध्ये पाहिला मिळत आहे अजून किती जीव गेल्यानंतर प्रशासन जागे होणार आहेत.
जड वाहनांच्या वाहतुकीतील चुकीचे कृत्य दिसत असून देखील प्रशासन गप्प का ? हा फार मोठा प्रश्न सर्वसामान्यांना पडत आहे. नक्की त्यांना राजकीय दबाव आहे का? त्यामुळे प्रशासन कारवाई करत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे असे इंदापूरकरांचे म्हणणे आहे.
त्याच इंदापूर मध्ये काही चुकीचे कृत्य झाल्यावर उपोषणे,आंदोलने देखील होतात. पण आज बेकायदेशीर जड वाहनांची वाहतूक उसाचे ट्रॅक्टर उसाचे ट्रक वाहतूक होत असून देखील कार्यकर्ते गप्प का हा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे.
एन टीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी पल्लवी चांदगुडे इंदापूर पुणे