पुणे :-
वैयक्तिक शेततळ्याच्या लाभासाठी शेतक-यांनी ऑनलाईन अर्ज करावेत असे आवाहन शिरूर तालुका कृषी अधिकारी सिद्धेश ढवळे यांनी केले आहे.
याबाबत माहिती देताना शिरूर तालुका कृषी अधिकारी सिद्धेश ढवळे यांनी सांगितले,
शेतकऱ्यांना संरक्षित पाण्याची सुविधा उपलब्ध होण्याकरता वैयक्तिक शेततळ्यासाठी अर्थसहाय्य करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत मार्फत मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्य शासनाने अनुदानाच्या रकमेत वाढ केलेली असून रु. ५०,०००/- ऐवजी रु. ७५०००/- अनुदान शेतकऱ्यांना मिळणार असल्याने शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी होऊन लाभ घ्यावा असे आवाहन तालुका कृषी अधिकारी श्री.सिध्देश ढवळे यांनी केले आहे.
या योजनेअंतर्गत शेततळ्याचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावा. याकरिता mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर शेतकरी योजना हा पर्याय निवडावा. त्यामध्ये सिंचन साधने व सुविधा या घटकाखाली वैयक्तिक शेततळे हे निवडावे. त्यानंतर इनलेट आऊटलेट सह अथवा इनलेट आऊटलेट विरहीत हा पर्याय निवडुन आकारमान व स्लोप निवडावा. महाडीबीटी पोर्टलवर सोडत द्वारे निवड लाभार्थीची करण्यात येईल. शेतकऱ्यांच्या नावे ६० गुंठे क्षेत्र असणे अनिवार्य असून शेततळे साठी जागा तांत्रिक दृष्ट्या योग्य असावी तसेच या पूर्वी मागेल त्याला शेततळे ,सामूहिक शेततळे अशा विविध योजनेतून लाभ घेतलेला नसावा. शिरूर तालुक्यासाठी सर्वसाधारण ९५ शेततळ्यास मंजूरी मिळणार असून जवळपास ७० लाख निधी मिळणार असल्याने शेतकऱ्यांना योजनेत सहभागी होऊन लाभ घ्यावा अशी माहिती तालुका कृषि अधिकारी शिरुर श्री.सिध्देश ढवळे यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे महाडीबीटी पोर्टलवर शेततळे अस्तरीकरण, कृषि यांत्रिकीकरण, ठिबक/तुषार संच, कांदाचाळ, शेडनेट/पॉलीहाऊस व इतर योजनांचाही लाभ घेण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी सिद्धेश ढवळे यांनी केले आहे.
एन टी व्ही न्यूज मराठीसाठी
प्रतिनिधी :- विजय ढमढेरे कोंढापुरी ता.शिरूर जि.पुणे 8975598628

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *