औरंगाबाद : सोयगाव तालुक्यातील बनोटी येथील सिद्धार्थ सोमा सोनवणे (ज्युनिअर भाऊ कदम) म्हणून त्यांची ओळख आहे सिद्धार्थ सोनवणे यांनी जिल्हा परिषद शाळा बनोटी दहावीपर्यंत शिक्षण घेऊन बारावी कॉलेज गोंदेगाव तालुका सोयगाव या ठिकाणी पूर्ण केले नंतर १८ वर्षापासून कलाक्षेत्रामध्ये काम करीत आहे आज पर्यंत सिद्धार्थ सोनवणे यांचे हास्य एक्सप्रेस कॉमेडी शो चे महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रा बाहेर व परराज्यामध्ये सात हजार पाच प्रयोग झाले आहेत आणि सिध्दार्थ यांची ओळख ज्युनिअर भाऊ कदम स्टार कलाकार म्हणून आहे १५० प्रकारचे आवाज मिमिक्री सोनवणे करतात आणि महाराष्ट्रातून आतापर्यंत बावीस पुरस्कार सिद्धार्थ ला प्राप्त झालेले आहेत सोनवणे यांनी अनेक सेलिब्रिटी कलाकारांसोबत काम केले आहे
जसे की कॉमेडियन राजू श्रीवास्तव, कॉमेडियन एहेसान कुरेशी, कॉमेडियन सुनील पाल, जॉनी लिव्हर व अशा अनेक दिग्गज कलाकारांसोबत स्टेज शो केले आहेत व अनेक कलाकारांसोबत छोटे-मोठे चित्रपट ही झाले आहे लढा मातीचा हा चित्रपट २०११ मध्ये या चित्रपटात सुद्धा सिध्दार्थ ने काम केलं होतं त्यामध्ये विजय कदम अभिनेता विजय चव्हाण अभिनेता आनंदकर यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली होती व अनेक चित्रपटात छोटे मोठे रोल केले आहे वेब सिरीज मध्ये काम केलं आहे आणि नुकताच दोन मिनिटात ४० प्रकारच्या आवाजासाठी गेलेत लोक वर्ल्ड रेकॉर्ड साठी एप्लीकेशन केलं आहे असे सिद्धार्थ सोनवणे यांनी सांगितलं व अशी सिध्दार्थ यांनी बोलताना प्रतिक्रीया दिली हास्य अभिनेता तथा ज्युनिअर भाऊ कदम मल्टी टॅलेंट स्टार कलाकार एस सिद्धार्थ सोनवणे त्यांच्या कार्याची दखल घेऊन.हा पुरस्कार सोहळा सु-लक्ष्मी बहुद्देशिय सेवाभावी संस्था व
माणुसकी रुग्णसेवा समूह घाटि औरंगाबाद मार्फत दिला जाणार आहे.औरंगाबाद येथे मोठ्या थाटात सेवा गौरव पुरस्कार वितरण सोहळा व भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन दिनांक ३०/१२/२०२२ रोजी शुक्रवारी मौलाना आझाद रिसर्च सेंटर टिव्हि सेटर औरंगाबाद येथे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.असे नीवड समिती तर्फे पत्राद्वारे समाजसेवक सुमित पंडित यांनी कळविले आहे.ह्या पुरस्काराने कलाकार एस सिद्धार्थ सोनवणे यांचे कौतुक होत आहे अशी माहिती सोनवणे यांनी बोलताना सांगितली
प्रतिनिधी जब्बार तडवी सोयगाव औरंगाबाद