section and everything up until
* * @package Newsup */?> हॅप्पी टू हेल्प फॉउंडेशन तर्फे भव्य बक्षीस वितरण व् आदर्श शिक्षक पुरस्कार सन्मान सोहळा थाटात संपन्न. | Ntv News Marathi

कृषीमंत्री ना.अब्दुल सत्तार साहेब यांच्या सह मान्यवरांच्या शुभ हस्ते 20 पुरस्कार प्रदान…

औरंगाबाद- सालाबादप्रमाणे या 9 व्या वर्षी ही हॅप्पी टू हेल्प फाउंडेशन तर्फे शिक्षकांसाठी ईद ए मिलादुन्नबी निमित्त राज्यस्तरीय निंबध स्पर्धा ठेवण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये विजेत्यानां पारितोषिक व ट्रॉफीचे वितरण करण्यात आले तसेच शिक्षक – शिक्षिका मध्ये उत्कृष्ट् शिक्षण देणाऱ्यां शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले ,या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे कृषिमंत्री तथा आमचे मार्गदर्शक मा.ना.श्री.अब्दुलजी सत्तार साहेब हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हुणून औरंगाबाद विभागाचे शिक्षक आमदार विक्रम काळे साहेब, मनपा उपायुक्त तथा शिक्षण विभाग प्रमुख श्रीम. नंदा गायकवाड मॅडम, जिल्हा परिषदेचे प्राथमिक उपशिक्षणाधिकारी श्री. सोफीजी लईक अहेमद सर, पैठण नगरीचे माजी नगराध्यक्ष श्री.जितसिंगजी करकोटक साहेब, मुख्याध्यापक संघाचे शिक्षक श्री. युनूसजी पटेल सर, आमचे सल्लागार तथा प्राचार्य मा.डॉ.सय्यद नईम सर, माजी नगरसेवक.कॉ. शेख बाबू,मा.श्री.जगदीशजी बेदवे आदींची उपस्थिति होती. कार्यक्रमाची सुरुवात कुराण पठणाने तर कार्यक्रमाची सांगता(शेवट) राष्ट्रगीत गायन करून झाली.सर्व प्रथम सर्व प्रमुख पाहुण्यांचे हॅप्पी टू हेल्प फॉउंडेशनच्या परंपरेनुसार सर्वाना पुस्तक व शाल आणि मोमेंटो देऊन सत्कार करण्यात आले. प्रथम ईद मिलाद नबी निमीत्त घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेतील अनुक्रमाने प्रथम, द्वितीय अणि तृतीय विजेत्यांना एक पुस्तक, शानदार ट्राफी, सन्मान पत्र व रोख रक्कम बक्षिसे देण्यात आली. तसेच या वर्षी दोन प्रोत्साहनपर बक्षिसे अनुक्रमे देण्यात आले. तसेच राज्यस्तरीय आदर्श शिक्षक-शिक्षिका पुरस्कार 2022 राज्यातून 4 शिक्षकांना देण्यात आले. तसेच 9 शिक्षकांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वाटप करण्यात आले. सर्व पुरस्कार प्राप्त शिक्षक-शिक्षिकांना मान्यवराच्या हस्ते शानदार ट्राफी, सन्मान पत्र एक पुस्तक आणि शाल देऊन सन्मान करण्यात आले. कार्यक्रम मौलाना आझाद संशोधन केंद्र, टीव्ही सेंटर औरंगाबाद येथे हा सोहळा थाटात उत्साहात पार पडला,कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन सय्यद अब्दुल रहीम यांनी केले तर प्रास्ताविक अध्यक्ष शेख अब्दुल रहीम सर तर अध्यक्षीय मार्गदर्शन भाषणात राज्याचे कृषिमंत्री मा.ना. श्री.अब्दुलजी सत्तारसाहेब यांनी केले तर शिक्षक आमदार श्री.विक्रमजी काळे, मनपा उपायुक्त श्रीम.नंदा गायकवाड मॅडम यांचे मार्गदर्शनपर भाषण झाले. अध्यक्षणीय भाषणात म्हणाले की हॅप्पी टू हेल्प फॉउंडेशनचे प्रत्येक कार्य सर्वांना प्रेरणादायी आहे तसेच शिक्षकांनीं आपली जबाबदारी खंबीरपणे पाळावी. तसेच हॅप्पी टू हेल्प फॉउंडेशनच्या सर्व टीम व विशेषकरून रहीम सरांना बधाई देतो की त्यांनी इतके चांगले आतापर्यंत उपक्रम यशस्वीपणे राबविले आहे हा शिक्षकांना प्रेरणा देण्याचे कार्य 9 वर्षापासून करीता करीत आहे, शिक्षक आमदार श्री. विक्रमजी काळे साहेबही म्हणाले की शिक्षकांची जबाबदारी वाढली आहे कारण आता पुरस्कार मिळाले आहे. आभार प्रदर्शन शफिक पठाण सर यांनी केले. या कार्यक्रमामध्ये शिक्षक -शिक्षिका, मित्र परिवार तसेच शैक्षणिक कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या नंतर सर्व शिक्षक-शिक्षिकांनी रिफ्रेशमेन्ट आणि चहाचा आस्वाद घेतला.या भव्य दिव्य कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी हॅप्पी टू हेल्प फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शेख अब्दुल रहीम, शेख शब्बीर ,शफीक पठाण, सय्यद ताजीम, अमोल कुळकर्णी, ॲड. इरफान खान, सय्यद अब्दुल रहीम, शेख जफर, शेख साबीर, शेख यासेर, फरमान खान, शेख अलीम,शाहीन नाज,सबा खान, सायमा नाज, शेख जुनेद, फैसल खान अहेमद, आदिनी प्रयत्न केले… “अल्लाहच्या कृपेने कार्यक्रम यशस्वी झाला याचा मला अभिमान आहे या कार्यक्रमामुळे आमचा विश्वास वाढला आहे व् आम्ही सर्व शिक्षक- शिक्षिकांचे तसेच आम्हाला मदत करणारे व् आम्हाला जिव लावणाऱ्या मित्र मंडळाचे मी सदैव आभारी राहीन व आपल्या सेवेसाठी 24 तास हज़र राहीन” –आपला मित्र शेख अब्दुल रहीम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *