औरंगाबाद : पोलीस स्टेशन पैठण हद्दीत बनावट लग्न लावुन नवरदेवाला व त्यांच्या परीवाराला लुटणाच्या घटना पैठण परीसरात वाढल्या असल्याने मा. पोलीस अधिक्षक श्री. मनिष कलवानिया यांनी दिलेल्या सुचना आणि मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस निरीक्षक श्री. किशोर पवार यांनी आपल्या अधिनिस्त पोलीस अंमलदार यांना कामकाज करण्याचे आदेश देवुन त्याअनुषंगाने पैठण शहर व हद्दीत पेट्रोलिंग करण्याचे आदेश असता काल दि. 03/12/2022 रोजी सायंकाळी 05.30 वाजेच्या सुमारास नाथ मंदिर पार्किंग परीसरात काही संशयीत व्यक्ती लग्नाचा बनाव करत असल्याची माहीती मिळाल्याने पेट्रोलिंग पोलीस पथकाने सदर घटनास्थळी वधु व वराच्या वेषात असलेल्या व्यक्तींची विचारपुस केली असता वधु पक्षाकडील व्यक्तींनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांमुळे पैठण पोलीसांचा सदर लग्नाबाबत संशय वाढल्याने वधु पक्ष व वर पक्षातील लोकांना पोलीस ठाणे पैठण येथे आणुन सखोल चौकशी केली असता प्रकाश गणेश मोरे वय 24 वर्षे रा. टाकेशिवणी ता. सिंदखेडराजा जि. बुलढाणा या युवकाचे लग्न जुळत नसल्याने आंबादास नवनाथ नागरे रा. दहेगाव ता. शेवगाव जि.अ.नगर ह.मु.नारळा, पैठण ता. पैठण याने प्रकाश मोरे यांच्या वडीलांना माझ्या परिचयाची एक मुलगी असुन तिला आई वडील नाही व एक भाऊ आहे. ती मुलगी परिस्थीने गरीब आहे. तरी तुमच्या मुलाचे त्या मुलीचे तुमच्या मुलासोबत लग्न लावुन देतो. त्या मोबदल्यात 1,50,000/-रु द्यावे लागतील असे म्हणुन काल रोजी मुलगी पाहण्यासाठी पैठण येथे बोलावुन लग्नाची तयारी करण्यासाठी सोन्याचांदीचे दागीने व कपडे असे एकुन 18,758/- रुपयांचे खरेदी करण्यास भाग पाडुन स्वतःकडे घेवुन फिर्यादी पक्षाची फसवणुक केल्याची फिर्याद प्रकाश गणेश मोरे याने दिल्यावरुन आरोपी 1) आंबादास नवनाथ नागरे रा. दहेगाव ता. शेवगाव जि.अ.नगर ह.मु.नारळा, पैठण ता. पैठण 2) राजु अंकुश चाबुकस्वार वय 39 वर्षे रा. चन्नापुरी ता. अंबड जि.जालना 3) उमेश गणेश गिरी वय 22 वर्षे रा. तिर्थापुरी ता. घनसांवगी जि. जालना 4 ) शिला मनोहर बनकर वय 35 वर्षे रा. एकतुनी ता.पैठण जि.औरंगाबाद यांचे वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउपनि मदने, पोना जिवडे आदि करत आहेत. यातील नमुद चारही आरोपी हे वेगवेगळ्या जातीधर्माचे असतांना त्यांनी फिर्यादीस वधु ही त्याच्या जाती व धर्माची असल्याची बतावणी करुन लग्नासाठी तयार केल्याचे त्यातुन स्वतःचा आर्थीक लाभ मिळवण्यासाठी बनावट लग्नाचा बनाव करुन फिर्यादीची फसवणुक केल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाले आहे.तसेच यातील बनावट लग्न टोळीतील आरोपीतांनी त्यांच्या वास्तव्याचे जिल्हे औरंगाबाद, जालना, अहमदनगर येथे तसेच परराज्यात देखील यापुर्वी याप्रकारचे बनावट लग्न केले असल्याचा संशय असुन त्या मुद्यावर तपास चालु आहे. सदरची कामगिरी मा. पोलीस अधिक्षक श्री. मनिष कलवानिया, अपर पोलीस अधिक्षक श्री. सुनिल लांजेवार, उपविभागिय पोलीस अधिकारी पैठण श्री. विशाल नेहुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. किशोर पवार, मपोउपनि स्वाती लहाने, पोउपनि संजय मदने, पोहेकॉ सुधीर ओव्हळ, पोअं. सचिन आगलावे, पोअं. मुजस्सर पठाण, पो. अं. बाबासाहेब शिंदे यांनी केली आहे.