सोलापूर : माढा..आज रोजी भोगेवाडी जाखले ग्रामपंचायत उपसरपंचपदी सौ. शारदा सिद्धेश्वर काळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. माजी उपसरपंच सौ शशिकला गायकवाड अणि विद्यमान सरपंच राणी गायकवाड यांच्या हस्ते श्रीफळ अणि हार घालून नूतन उपसरपंच चा सत्कार करण्यात आला.मावळते माजी उपसरपंच मा. संतोष काळे यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमास गावातील प्रतिष्ठित आणि जेष्ठ नागरिकांची उपस्थिती नोंदवली.ग्रामपंचायत चे सदस्य रामलिंग पवार, संतोष गायकवाड सर, राजेंद्र देवकर सर, माजी सरपंच रावसाहेब कौले, श्रावण शिवणे, नानासाहेब काळे,संदीपान काळे सर, पो. पाटील सुरेश, दीपक धुमाळ, रामचंद्र कोकाटे, बागायतदार भैरू शिवणे, रामचंद्र शेळके यांची उपस्थिती लाभली.तसेच भोगेवाडी गावचे सुपुत्र डॉ. विजय प्रकाश काळे यांची प्रोफेसर पदी नियुक्ती झाली त्यानिमित्ताने त्यांचा ही सत्कार ठेवण्यात आला होता. त्यांचा सत्कार गायकवाड सर यांच्या हस्ते करण्यात आला.गावातील बरीच प्रतिष्ठित लोकांची उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली.
एन टीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी संदीप भगत सोलापूर…