औरंगाबाद :
सुमारे दोनशे वर्षांपूर्वी बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलेले दर्पण वृत्तपत्र ते सध्याची स्थिती तपासून पहिली तर माध्यमांचे स्वरूप बदलले आहे. सोशल मीडियामुळे आज प्रत्येक जण पत्रकार बनलेला आहे. असे मानले तर वावगे ठरणार नाही. असे प्रतिपादन प्रा.भारत शिरसाठ यांनी केले. अट्टलमत कार्यालयाच्या प्रांगणामध्ये दर्पण दिन कार्यक्रमात ते बोलत होते. एडिटर अँड प्रेस रिपोर्टर असोसिएशनच्या वतीने दर्पण दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वरिष्ठ पत्रकार स. सो.खंडाळकर हे होते तर प्रमुख पाहुणे,रतनकुमार पंडागळे, सेवानिवृत्त माहिती अधिकारी एस.के. बावस्कर, सामाजिक कार्यकर्ते राहुल साळवे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. एडिटर अँड प्रेस रिपोर्टर असोसिएशनचे अध्यक्ष रतनकुमार साळवे यांनी प्रास्ताविक केले. पुढे बोलताना प्राध्यापक शिरसाट म्हणाले की आज प्रत्येक घटना, प्रत्येक बातमी क्षणार्धात सोशल मीडियामुळे सर्वांपर्यंत पोचू शकते. सोशल मीडियाचा स्पोट होत आहे त्यामुळे प्रत्येक जण पत्रकार झाला आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. सामाजिक राजकीय स्थिती बदलत आहे त्याचप्रमाणे माध्यमांचे ही स्वरूप बदलत आहे. अशा या स्थितीत बाळशास्त्री जांभेकरांचा आदर्श समोर ठेवला पाहिजे. आज व्यक्त होण्यावर बंधन येत असली तरी रवीशकुमार ,निखिल वागळे यांच्यासारखे पत्रकार सत्य मांडण्याची धडपड करतात. हे प्रशसनीय आणि प्रेरणादायी वास्तव आहे. सत्याचा आग्रह धरणारे पत्रकारच टिकू शकतात असेही प्रा. सिरसाट यांनी स्पष्ट केले. सामाजिक कार्यकर्ते राहुल साळवे यांनी यावेळी बोलताना सांगितले की, बाळशास्त्री जांभेकरांनी कोणतीही जाहिरात न घेता वृत्तपत्र सुरू ठेवले. जांभेकरांनी केलेले जनतेचे प्रबोधन वाखानण्यासारखे होते. असे राहूल साळवे यांनी स्पष्ट केले. जेष्ठ पत्रकार स. सो.खंडाळकर यांनी अध्यक्षीय समारोप करताना सांगितले की, पत्रकारांनी पत्रकार म्हणून काम करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श समोर ठेवला पाहिजे. पत्रकारांनी भूमिका घेऊन पत्रकारिता केली पाहिजे असे आवाहनही खंडाळकर यांनी केले. निवृत्त माहिती अधिकारी एस के बावस्कर यांनी मुद्रित माध्यमांचे महत्त्व स्पष्ट केले. मुद्रित माध्यमांना कधीच मरण नाही असेही ते म्हणाले. ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश्वर खंदारे यांनी समाज हिताची पत्रकारिता केली पाहिजे असे आव्हान केले. प्रास्ताविक भाषणात रतन कुमार साळवे यांनी सांगितले की दर्पण दिन हा कार्यक्रम आम्ही अनेक अर्थाने साजरा करतो. पत्रकार या निमित्ताने एकत्र होत असतात. पत्रकारांच्या विविध समस्यावर या निमित्ताने चर्चा होते. असे रतनकुमार साळवे यांनी सांगितले. प्रारंभी दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपस्थित मान्यवर पत्रकार तर्फे अभिवादन करण्यात आले. उपस्थित सर्व पत्रकार बंधूंचे मान्यवरांचे स्वागत संस्थापक अध्यक्ष रतन कुमार साळवे, संघटनेचे कार्याध्यक्ष राजपाल सिंग अटल जिल्हाध्यक्ष गणेश पवार यांच्या हस्ते शाल व पुष्पहार देऊन करण्यात आले. गणेश पवार यांच्या आभार प्रदर्शनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमात शहरातील व ग्रामीण भागातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रामुख्याने मनीष अग्रवाल,बाजीराव सोनवणे, सुजित ताजने, रमेश वानखेडे, भाऊसाहेब शेजूळ,कल्याण देहाडे,जगन्नाथ सुपेकर, राजेश वानखेडे,शेख शफीक, महेश मुरकुटे, शेख फिरोज, प्रवीण बोर्डे, समाधान वाणी, अमित वाहुळ, हेमंत कोतकर, आदींची उपस्थिती होती. अशी माहिती रतन कुमार साळवे यांनी दिली
प्रतिनिधी जब्बार तडवी औरंगाबाद