औरंगाबाद :
सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथील निखिल पंढरी टिकारे यांची सोयगाव तालुका युवक कॉंग्रेस अध्यक्ष पदी निवड करण्यात आली माजी आमदार तथा जिल्हा अध्यक्ष औरंगाबाद डाॕ कल्याण काळे यांच्या हस्ते निवड करुन त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. निखील पंढरी टीकारे यांच्यावरती विश्वास दाखवत पक्षा चे ध्येय धोरण तळा गळात पोहचावे आणि संघटन मोठ्याप्रमानात वाढवावे या ध्येयाने निखील टिकारे यांच्यावरती विश्वास ठेऊन हे नियुक्ती पत्र देण्यात आले
पक्षाचे विचार सर्व सामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी माझे सहकार्य राहील तसेच आपल्याला दिलेली जबाबदारी आपण प्रामाणिकपणे पार पाडनार असा विश्वास टिकारे यांनी दिला .निखील टिकारे यांना पक्षाच्या वतीने मान्यवरांनी व पदाधिकारी यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या पुर्ण सोयगाव तालुक्यामधुन आणि सावळदबारा परिसरामधुन शुभेच्छाचा वर्षाव निखील टिकारे यांच्यावरती होत आहे यावेळी सावळदबारा, फर्दापुर , सोयगाव या परिसरातील मान्यवर आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जिल्हा वरिष्ठ पद अधीकारी उपस्थित होते.
प्रतिनिधी जब्बार तडवी सोयगाव औरंगाबाद