तक्रार करूनही पथदिवे सुरू होईनात…

औरंगाबाद : वर्षानुवर्ष सिडको वाळूज महानगरातील विविध भागातील पथदिवे बंद असून नागरिक व स्थानिक पदाधीकाऱ्यांकडून वारंवार वार तक्रार करूनही हे पथदिवे सुरू होत नाही, या रस्त्यावरील पथदिवे बंद असल्याने परिसरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे सिडको वाळूज महानगरमधील वर्षानुवर्षे बंद असलेले सुरू करा अशी मागणी पत्राद्वारे तिसगावचे उपसरपंच नागेश कुठारे यांनी सिडको अधिकारी यांच्याकडे केली आहे.

सिडको वाळूजमहानगर प्रकल्प अंतर्गत सर्व नगरातील पथदिवे हे LED चे उभारण्यात आले असुन त्यापैकी LED पथदिव्या पैकी जवळपास ३० % पेक्षा जास्त LED फिटिंग बंद किंवा ना दुरूस्त अवस्थेत आहेत अशा तक्रारी मागील कित्येक महिन्यांपासून राजस्वप्नपुर्ती,आदर्श काॅलनी,म्हाडा काॅलनी,सिध्दिविनायक विहार, मालपाणी बात्रा,कल्याणी सिटी,स्नेहवाटीका, तापाडिया ईस्टेट, मनाली द्वारकापुरम, साक्षी नगरी,साक्षी रेसिडन्सी, तिसगाव ते वडगाव रोडवरील,गणेश नगर, फुलोरा सोसायटी,सारा व्यंकटेश, व्यंकटेश सोसायटी,रोझबर्ड ते विजय स्टिल रोड,आकाश विहार,अष्टविनायक पार्क, जिजाऊनगर, महावीर नगर,शिवराज सोसायटी,मनाली रेसिडन्सी,सारा संगम,सारा व्यंकटेश या काॅलनीतून सोसायटीचे पदाधिकारी, नागरिक यांच्याकडून तक्रारी प्राप्त होत असुन या अनुषंगाने संबंधित अधिकारी तसेच कंत्राटदार यांना या बाबत तक्रार/माहीती दिली असता LED उपलब्ध नाहीत, आज होतील, उद्या होतील असे बेजबाबदार उत्तर त्यांच्या कडून तक्रारदार यांना भेटत असुन प्रत्यक्षात मात्र पथदिवे सुरू होत नाहीत यामुळे छोटे मोठे आपघात तसेच परिसरामध्ये छोट्या मोठ्या चोरीच्या घटना सुध्दा घडल्या आहेत. पथदिवे व ईतर सुविधा पोटी सिडको प्रशासन सेवा कर आकारते, कर भरण्यास उशीर झाला तर दंडासह कर भरणा करावा लागतो मात्र बदल्यात सुविधा मात्र देण्यास प्रशासनाकडून टाळाटाळ करण्यात येते तरी आपण परिसरातील पथदिव्यांची संयुक्त पहाणी करून लवकरात लवकर पथदिवे दुरूस्ती करावे अन्यथा आम्हास कायदेशीर मार्गाचा अवलंब करत न्यायालयात या बाबत दाद मागावी लागेल अशी मागणी उपसरपंच नागेश कुठारे यांनी पत्राद्वारे केली आहे.

प्रतिनिधी:- अनिकेत घोडके
Ntv न्युज मराठी, वाळूज औरंगाबाद.
मो.8484818400

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *