ममनापुर वस्ती (ता.खुलताबाद) येथील शेतवस्तीवर लुटण्याच्या उद्देशाने आलेल्या लुटारुला मिठी मारीत पकडुन ठेवत,कडवा प्रतिकार केला ही घटना बुधवारी घडली,या बाबत खुलताबाद पोलीस ठाण्यात अंकुश जगन्नाथ आधाने रा.ममनापुर वस्ती यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन इम्रान कदीर पटेल रा.टाकळी राजाराय याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असुन,घटनास्थळी उपविभागिय पोलीस अधिकारी मुकुंद आघाव यांनी भेट दिली.
या बाबत खुुलताबाद पोलीस ठाण्यात आधाने यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,ममनापुर शिवार वस्तीवर आपण कुटुंबासह राहतो,राञी साडे आठच्या दरम्यान वर नमुद व्यक्ती हातात विळा घेवुन माझ्या दिशेने येत होता,त्याच वेळी त्याने माझ्या डोळ्यात मिरचीची पुड टाकली,व तुमच्या कडे असलेले पैसे काढा,असे धमकावत माझ्या दिशेने चाल केली,मी प्रसंगावधान राखीत त्याला मिठी मारुन पकडुन ठेवीत,घरातील मंडळींना फोन करण्यास सांगितले,त्यानुसार पत्नीने सुनिल आधाने यांना केला,त्यांनी परिसरातीव नातेवाईकांना कळविल्याने सर्वांनी शेतवस्तीवर धाव घेतली,त्याचवेळी पोलीस प्रशासनाला कळविल्याने पोलीस पथकही दाखल झाले व सदरीव लुटारुला ताब्यात घेतले.या संबंधीचा अधिक तपास पोलीस निरीक्षक भुजंग हातमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुर आबे.
दरम्यान या परिसरात मागील चार दिवसांपासुन बिबट्याचा मुक्त संचार असुन,नागरिक भयभीत झालेले आहेत,लुटारु व फिर्यादी अंकुश आधाने यांच्यात अंधारात झटापट सुरु असतांना त्यांचे कुटुंबिय व शेतवस्तीवरील ग्रामस्थांना बिबट्याने हल्ला केल्याचे वाटले,त्यावरुन काहीनी घाई घाईने वन विभागालाही कळविले,पोलीस व वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहचल्यानंतर खरी प्रकार समोर आला.
