वाशिम:- मंगरुळपीर शहरातील देवकी भवन येथे राजस्थानी महिला मंडल च्या वतीने आझादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमाला मुख्य अतिथि श्रीमती चंदाबाई दामोदर बियाणी, मधुभाभी लोहिया या होत्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी माहेश्वरी संगठन विदर्भ संयोजिका मीनाक्षी बाहेती तर प्रमुख उपस्थिती माहेश्वरी संगठन वाशिमच्या जिल्हाध्यक्षा सौ पद्मा धूत सचिव सौ कल्पना चांडक,जिल्हा सहसचिव कीर्ति सोनी मंगरुलपीर तहसील अध्यक्षा सौ माधुरी राठी ,तहसील सचिव सिमा बाहेती,वरिष्ठ महिला मंडळ अध्यक्षा सुशीला भूतड़ा,कोरियोग्राफर तेजश्री शर्मा हया होत्या.
हया वेळी जिल्हाध्यक्षांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की मंगरुलपीर राजस्थानी महिला मंडळाने मागील तीन वर्षात सर्वात जास्त कार्यक्रम घेतले प्रत्येक कार्यक्रम नियोजन बद्ध होते माहेश्वरी संगठन मंगरुलपीर तहसील अध्यक्षा माधुरी राठी ने शहरातील सर्वच राजस्थानी महिलांना सोबत घेवून हया तीन वर्षात मंगरुलपीर महिला मंडळाचे नाव प्रदेश स्तरावर नेले प्रदेश, जिल्हा स्तरीय पुरस्कार मंगरुलपीर महिला मंडळाला प्राप्त झाले तसेच मंगरुलपीर तालुका अध्यक्षा माधुरी राठी नी आपले विचार व्यक्त करताना सांगितले की तीन वर्षा आधी जेव्हा मी पदभार स्वीकारला तेव्हा कोरोना महामारी सुरु झाली होती त्यांची पर्वा न करता आम्ही विविध ऑनलाइन स्पर्धा घेतल्या व कोरोना काळात आम्ही शहरातील सरकरी कार्यलयात जावून मास्क, सेनेटाइजर,डेटॉल साबन, किट वाटप केली असे विविध कार्य केले हे कार्य माझ्या सर्व टीम च्या सहकार्याने झाले मला माझ्या सर्व ग्रुप मेंबर, राजस्थानी समाजातील सर्व वरिष्ठ महिला,भगिनी ,वहिनी, ताई, मूली व सर्वांच सहकार्य मिळाले त्या मुळे मी मंगरुलपीर महिला मंडळाचे नाव प्रदेश स्तरा पर्यंत पोहचवु शकले
भारत हे वर्ष आझादी चा अमृत महोत्सव म्हणून साजरा करत आहे हा उत्सव मोठ्या उत्साहने साजरा करण्यासाठी राजस्थानी महिला मंडल मंगरुलपीर ने विविधता में एकता व अन्य कार्यक्रमाचे आयोजन केले होते हया मध्ये भजन स्पर्धा, रागोळी स्पर्धा , चारभुजानाथ चे मुकुट बनवीने, पुराना दौर,डायलॉग,हे सर्व कार्यक्रम ठेवण्यात आले होते हया कार्यक्रमा मध्ये शहरातील प्रत्येक भागातील महिलानी भारतातील प्रत्येक प्रदेशातील संस्कृतिची वेशभूषा करुण न्यूत्य सादर केले तसेच हा आगळा वेगळा कार्यक्रम बघण्यासाठी शहरातील महिलांनी एकच गर्दी केली होती विविधता में एकता हया साठी ग्रुप देशभक्ति, राजस्थानी, महाराष्ट्रीयन,गुजराती, कोळी, पंजाबी,बंगाली, साउथ, ओल्ड इज गोल्ड असे ग्रुप होते हया सर्व ग्रुप मध्ये एकुन 70 ते 80 महिलांनी सहभाग घेतला हया सर्व ग्रुप चे नृत्य एवढे चांगले झाले की सर्वाना 70 ते 80 महिलांना मंडळा कडून सन्मान चिन्ह देवून सन्मानित करण्यात आले,भजन स्पर्धा सुशीला बाहेती, सुनीता बाहेती,गुंजन मुंदड़ा,लता बजाज ,रंगोळी स्पर्धा स्नेहा बाहेती, निशिका बाहेती, गुंजन मुंदड़ा,मुकुट स्पर्धा कोमल बंग, संध्या राठी,गुंजन मुंदड़ा, सुष्मिता बाहेती,पुराना दौर स्पर्धा नम्रता जोशी, कोमल बंग ,सुष्मिता बाहेती,कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माधुरी राठी, सुरेखा बाहेती ,सिमा बाहेती,भूमिका बियाणी, दिशा बजाज, दीपा जोशी, मीना राठी, माधुरी जाखोटिया,ज्योति बंग, वैशाली छल्लानी, रीता बाहेती, ज्योती बंग,सुनीता जाखोटिया,शिल्पा चांडक,विना ओझा,पूजा भूतड़ा,श्रुति शर्मा,नी अथक परिश्रम घेतले कार्यक्रमा चे प्रास्ताविक कल्पना जाखोटिया नी केले तर आभार प्रदर्शन सिमा बाहेती ने केले.

प्रतीनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *