वाळूज महानगर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी अशोक कांबळे तर सचिवपदी संदीप लोखंडे यांची बुधवारी (दि.१८) बहुमताने निवड करण्यात अली. बजाजनगरातील वैष्णोदेवी उद्यान येथे बुधवारी वाळूज महानगर पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर कुरणे यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार संघाची बैठक घेण्यात अली. या बैठकीत विविध विषयावर सविस्तर चर्चा करुन पत्रकार संघाच्या नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात अली.
या बैठकीत सर्वानुमते पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी -अशोक कांबळे, उपाध्यक्ष- चंद्रकांत चाबुकस्वार, सचिव- संदीप लोखंडे, सहसचिव – अशोक साठे, कोषाध्यक्ष – माधव घोरबांड, कार्याध्यक्ष – संजय मगरे, यांची तर सल्लागार म्हणून- चंद्रशेखर कुरणे, महेमूद शेख, देविदास त्रिंबके, रामराव भराड, श्यामसुंदर गायकवाड, मुकेश चौधरी भागीनाथ जाधव, संतोष उगले, किशोर बोचरे, शिवाजीराव बोडखे, गणेश गाडेकर,यांची निवड करण्यात आली. बैठकीला संतोष बारगळ, संदीप चिखले, संतोष बोटवे, भारत थटवले , संजय काळे, अनिकेत घोडके, निलेश भारती, गजानन राऊत, राहुल मुळे, राजू जंगले, डी पी वाघ, अभिजीत चौरे, शिवाजी गायकवाड, अतिष वानखेडे, सुदाम गायकवाड, आदींची उपस्थिती होती.
प्रतिनिधी:- अनिकेत घोडके
NTV न्युज मराठी, वाळूज औरंगाबाद.
मो.8484818400